भुतेकर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:35+5:302021-03-08T04:28:35+5:30
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी जालना : शहरातील विविध भागात अवैध देशी, विदेशी, गावठी दारू विक्री सुरू आहे. ...
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जालना : शहरातील विविध भागात अवैध देशी, विदेशी, गावठी दारू विक्री सुरू आहे. अनेक ठिकाणी भर रस्त्यावर दारू विक्री केली जात असून, तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय महिलांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
खंडित वीजपुरवठा; शेतकऱ्यांची गैरसोय
भोकरदन : तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. कधी रोहित्र जळाल्याने, तर कधी इतर कारणांनी वीज गूल होत आहे. अचानक वीज गूल होत असल्याने शेतातील उभ्या पिकाला पाणी देणे मुश्कील झाले आहे. हाती आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. संबंधितांनी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
बालसाहित्य लिहिताना विचारांची कसोटी लागते
जालना : बालसाहित्य लिहायला बालकांची मानसिकता समजून घेता आली पाहिजे. अशा विचारांची कसोटी ज्याला जमते तोच उत्तम बालसाहित्य निर्माण करू शकतो, असे प्रतिपादन सेवानिवृत्त अभियंता एस. एन. कुलकर्णी यांनी केले. डॉ. नंदकिशोर डंबळे यांच्या बालनाटिका पुस्तकाच्या विमोचनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. बी.वाय. कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते.