राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी पाच विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:27 AM2021-01-22T04:27:58+5:302021-01-22T04:27:58+5:30

राजूर : सलाम मुंबई फाऊंडेशन मार्फत तंबाखूमुक्त शाळा अभियानअंतर्गत जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने राबविल्या जाणाऱ्या ऑनलाईन राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी भोकरदन ...

Selection of five students for state level children's council | राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी पाच विद्यार्थ्यांची निवड

राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी पाच विद्यार्थ्यांची निवड

Next

राजूर : सलाम मुंबई फाऊंडेशन मार्फत तंबाखूमुक्त शाळा अभियानअंतर्गत जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने राबविल्या जाणाऱ्या ऑनलाईन राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी भोकरदन तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात प्रतीक्षा सोनुने (प्रा. शाळा, मूर्तड), सुमेध शिंगणे (प्रा. शाळा जवखेडा ठों), भक्ती फुके (प्रा. शाळा उमरखेडा), महादेवी वायाळ (के. प्रा. शाळा राजूर) व समीक्षा जाधव (प्रा. शाळा वालसा) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या बालपरिषदेच्या तयारीसाठी नऊ सत्रांमधून विद्यार्थ्यांना सलाम मुंबई फाउंडेशनच्या तज्ज्ञांकडून तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती, सत्यता व स्वत:ची ओळख आणि आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सवयीची जडण- घडण, वाईट सवयी नाकारण्याचे कौशल्य, शाळा स्तरावरील बाल पंचायतची भूमिका व जबाबदारी, समस्या सोडवण्याच्या पद्धती व सामाजिक समर्थन संकल्पना, ध्येय निश्चिती ओळख, तंबाखू नियंत्रण कायदा २००३, लेखन कौशल्य, मीडिया आणि मीडियाचे वेगवेगळे प्रकार, पोलीस विभाग व अन्न आणि औषध प्रशासनासोबत काम करणे आदी विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. आपली शाळा व परिसर तंबाखूमुक्त करण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, पोलीस व सामाजिक न्याय विभाग यांच्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा साधण्यासाठी विद्यार्थ्यांना या ऑनलाईन प्रशिक्षणातून योग्य मार्गदर्शन मिळत आहे, अशी माहिती जि. प. प्रा. शाळा उमरखेडा येथील तालुका मार्गदर्शक ज्ञानेश्वर झगरे यांनी दिली.

राज्यस्तरीय बाल परिषदेसाठी तालुक्यातून उपक्रमशील शिक्षक झगरे व पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. याबद्दल सलाम मुंबई फाउंडेशनचे सतीश वानखेडे, निर्माण विकास संस्थेचे बनसोडे, अनुप मोरे, गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, केंद्रप्रमुख रमेश पुंगळे, मुख्याध्यापक विठ्ठल घायाळ, बी. एम. रायते, बी. जी. पाटील, एकनाथ बाहेकर, दत्तात्रय घायाळ, भास्कर कढवणे, संजय शिंगणे, के. डी. वाघ आदींनी त्यांचे स्वागत केले.

चौकट

भोकरदन तालुक्यातील सर्वप्रथम तंबाखूमुक्त झालेल्या उमरखेडा शाळेने तंबाखू मुक्तीसाठी वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या काळातसुद्धा तंबाखू मुक्तीसाठी शाळा स्तरावर वेळोवेळी ज्ञानेश्वर झगरे यांनी मार्गदर्शन केले आहे.

Web Title: Selection of five students for state level children's council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.