विजय कुमठेकर यांची मार्गदर्शकपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:41+5:302021-07-22T04:19:41+5:30

मध्यवर्ती बसस्थानकात १५० झाडांची लागवड भोकरदन : भोकरदन शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ...

Selection of Vijay Kumthekar as the guide | विजय कुमठेकर यांची मार्गदर्शकपदी निवड

विजय कुमठेकर यांची मार्गदर्शकपदी निवड

Next

मध्यवर्ती बसस्थानकात १५० झाडांची लागवड

भोकरदन : भोकरदन शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते १५० रोपट्यांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी आगारप्रमुख रंजित राजपूत, सहायक कार्यशाळा पर्यवेक्षक पंकज पाटील, वाहतूक निरीक्षक शरद पंडित, वाहतूक नियंत्रक नंदकिशोर राऊत, प्रकाश कर्वे, देविदास देशमुख, जानकीराम होळकर, दीपक नाईक, शिवाजी सपकाळ, शेख सलिम, शेख पाशू, शेख सगिर, शेख जावेद, भागवत लोखंडे, बबाबाई म्हस्के आदींची उपस्थिती होती.

गेवराई ते फाटा रस्त्याची दुरवस्था

बदनापूर : बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई ते जालना-औरंगाबाद महामार्गावरील फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्याला नदीचे व रेदाडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अक्षरक्ष: तारेवरची कसरत करावी लागते.

ईदच्या पार्श्वभूमीवर परतूर येथे बैठक

परतूर : आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी परतूर पोलीस ठाणे येथे शांतता समितीची बैठक मंगळवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पालिका मुख्याधिकारी सुधीर गवळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, मराठा सेवा संघाचे पांडुरंग नवल, उपनगराध्यक्ष सादेख खतीब, अशोक बरकुले, नगरसेवक राहिमोद्दीन कुरेशी, अय्युब कुरेशी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

तेली महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी म्हस्के

जालना : तेली महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी भगवान भानुदास म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्ता क्षीरसागर यांच्या आदेशानुसार प्रदेश महासचिव ज्ञानेश्‍वर दुर्गुडे यांनी केली आहे. भगवान म्हस्के यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

अर्शद चौधरी यांची अध्यक्षपदी निवड

शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथे बागवान जमात कमिटीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या कमिटीच्या अध्यक्षपदी अर्शद खालेक चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी अहमद राजू बागवान, सचिव सिराज चौधरी, तर सदस्यपदी मोबीन करीब बागवान, निसार इसाक बागवान, माजिद शब्बीर बागवान, अफसर अ. वाहेद बागवान, रफीक रजाक बागवान, हाजी मन्नान मिट्ठू नाईक आदींची निवड करण्यात आली.

पावसामुळे रस्त्यावर चिखल, नागरिक त्रस्त

घनसावंगी : तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील गावांतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. थोडाही पाऊस झाला की, या मार्गावर चिखल होत आहे. या चिखलातून प्रवास करताना चालकांना कसरत करावी लागत असून, पादचारी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतीने गावांतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

रेशन किटचे वाटप

जालना : कार्ड, क्रांतिसिंह संस्था व रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने शहरातील गरजू ५० कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी विष्णू पिवळ, उषा शिंदे, अयोध्या टेमकर, हर्षद ढवळे, वर्षा लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गुटखाविक्री जोमात

भोकरदन : शासनाने गुटखा विक्री, वाहतुकीवर बंदी घातली आहे. परंतु, अनेकजण अवैधरीत्या गुटखा विक्री, वाहतूक करीत आहेत. शासन आदेशाचे उल्लंघन करून गुटख्याची विक्री वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

चोरांमुळे शेतकरी त्रस्त

जालना : जिल्ह्याच्या विविध भागांतून पशुधन चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. ऐन खरीप हंगामात हे होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय, दाखल गुन्ह्यांचाही तपास लागत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

रस्ता दुरुस्तीची मागणी

अंबड : शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

चेके यांचा सत्कार

टेंभुर्णी : येथील जेबीके विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भास्कर चेके यांचा जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य संजय फलटणकर यांच्यासह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Selection of Vijay Kumthekar as the guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.