श्रीकांतच्या अटकेमुळे तर्कवितर्कांना उधाण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:05 AM2018-08-20T01:05:04+5:302018-08-20T01:05:35+5:30
शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला शनिवारी एटीएसने अटक करून मुंबईत सीबीआयच्या हवाली केले आहे. श्रीकांतच्या एकूणच येथ पर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले होते, मात्र तो एखाद्या संघटनेच्या कामात एवढा अडकून जाईल असे कोणालाच वाटले नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला शनिवारी एटीएसने अटक करून मुंबईत सीबीआयच्या हवाली केले आहे. श्रीकांतच्या एकूणच येथ पर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले होते, मात्र तो एखाद्या संघटनेच्या कामात एवढा अडकून जाईल असे कोणालाच वाटले नव्हते.
जुन्या जालन्यातील रहिवासी असलेल्या श्रीकांतच्या घरातूनच त्याला राजकारणाचे बाळकडू मिळाले. वडिलही भाजपमध्ये होते. तरूणपणी तो शिवसेनेकडे आकर्षित झाला होता.नगरसेवक म्हणून २००१ आणि २००६ मध्ये शिवसेनेकडून निवडूनही आला होता. २०११ मध्ये त्याल सेनेने तिकीट न दिल्याने त्याने पत्नीला अपक्ष म्हणून उभे केले होते.
कोणाचाही मदतीला धावून जाणारा युवक म्हणून त्याची परिसरात ख्याती होती. गणेश उत्सव, दुर्गाउत्सव तो पुढाकार घेऊन साजरा करायचा. मात्र नंतर तो एवढा कट्टर कसा बनला, या बद्दल मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.