टंचाई निवारणासाठी सात कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:46+5:302021-03-05T04:30:46+5:30
जालना जिल्ह्यात पूर्वीपासूनच टंचाई ही पाचवीलाच पुजली आहे. त्यावर वेगवेळ्या सरकारांनी बरेच प्रयत्न करून जिल्हा टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न केला ...
जालना जिल्ह्यात पूर्वीपासूनच टंचाई ही पाचवीलाच पुजली आहे. त्यावर वेगवेळ्या सरकारांनी बरेच प्रयत्न करून जिल्हा टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात पूर्वी जलस्वराज्य योजना, नंतर शिवकालीन पाणीपुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना, अशा अनेक योजना राबवून त्यावरही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असताना अद्यापही जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषद तसेच भूजल सर्वेक्षण विभागाने त्यांच्या जवळपास शंभरपेक्षा अधिक निरीक्षण विहिरीतून सर्व्हे करून हा टंचाई आराखडा तयार केला आहे.
जिल्ह्यातील जवळपास ५३३ गावे आणि ७० पेक्षा अधिक वाड्यांमध्ये ही टंचाई जाणवू शकते. या हेतूने या आराखड्यात नळ योजांनी दुरुस्ती, तसेच नवीन विंधन विहीर घेणे, नळ योजना कार्यान्वित करणे आदी कामे करण्यात येतात, तसेच टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठीदेखील आरााखड्यात तरतूद केली असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
जिल्ह्यातील टंचाई आराखड्याचा तपशील