जालन्यातील औद्योगिक वसाहतीत दरोडा टाकणारे सात जण मुंबईतून गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 01:02 PM2018-03-25T13:02:21+5:302018-03-25T13:02:21+5:30

जालना येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण करत दरोडा टाकणा-या टोळीतील सात संशयितांना मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

Seven people, who commit robbery in industrial colonies in Jalna arrested | जालन्यातील औद्योगिक वसाहतीत दरोडा टाकणारे सात जण मुंबईतून गजाआड

जालन्यातील औद्योगिक वसाहतीत दरोडा टाकणारे सात जण मुंबईतून गजाआड

Next

 जालना-  येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण करत दरोडा टाकणा-या टोळीतील सात संशयितांना मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडू चोरीतील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेला ट्रक, असा एकूण २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवारी कारवाईबाबत माहिती देण्यात आली.

औद्योगिक वसाहतीमधील शिला व पंकज इंडस्ट्रीमध्ये २९ मार्चच्या मध्यरात्री आठ ते नऊ चोरट्यांनी कंपनीतील सुरक्षारक्षकांना चाकूचा धाक दाखवून त्याचे हातपाय बांधून टाकत ट्रॉन्सफार्मर दुरुस्तीसाठी वापरले जाणारे तांब्याच्या तारा, पट्टी, स्क्रॅप, ब्रॉस रॉड, एलसीडी, मोबाईल व दुचाकी, असा एकूण १३ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी पथकासह घटनास्थळी बारकाईने पाहणी करून तपास सुरू केला. त्यासाठी खबºयांना कामाला लावले. दरम्यान, औद्योगिक वसाहतीत चोरी करणारे संशयित मुंबईतील घाटकोपर भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई येथे जावून संशयित अब्दुल्ला जमीरउल्ला अन्सारी (३१, रा. तेनवा, उत्तरप्रदेश), अब्दुल सईम महंमद युनूस (२२,रा.सत्तवाडी, सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश),  असलम अली अक्रम अली (३१ घाटकोपर, मुंबई ), अब्दुल सलीम खान (४२ घाटकोपर, मुंबई) मोहंमद इम्रान नियाजोद्दिन ( २७, रा. सिपलीनगर, ठाणे), अकबर अबीद खान (४५, कुर्ला मुंबई) इरशाम अहमेद खान ( ३१, मुंब्रा, ठाणे) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.  चौकशीत त्यांनी औद्योगिक वसाहतीमधील चोरीचे कबुली दिली. तसेच चोरलेला  १३ लाख ८७ हजारांचा मुद्देमालही काढून दिला. गुन्ह्यात वापरलेला नऊ लाखांचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी संशयितांना मुद्देमालासह जालना येथे आणले. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक सुनील इंगळे, शेख रज्जाक, संतोष सावंत, प्रशांत देशमुख, कैलास जावळे, समाधान तेलंग्रे, वैभव खोकले, रंजित वैराळ यांनी ही कारवाई केली.

Web Title: Seven people, who commit robbery in industrial colonies in Jalna arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.