शैलेश बलकवडे जालन्याचे नवे SP; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर तात्काळ स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:01 PM2023-09-03T18:01:40+5:302023-09-03T18:02:08+5:30

जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

Shailesh Balakwade is the new SP of Jalana; Assumed charge immediately after instructions from Chief Minister | शैलेश बलकवडे जालन्याचे नवे SP; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर तात्काळ स्वीकारला पदभार

शैलेश बलकवडे जालन्याचे नवे SP; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर तात्काळ स्वीकारला पदभार

googlenewsNext

जालना : पुणे येथील राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी रविवारीच दुपारी पदभार स्वीकारला आहे.   

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. ३१ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिस त्यांना आणण्यासाठी गेले होते. त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हवेत गोळीबारही करण्यात आला. याचे पडसाद राज्यभरात उमटले असून, अनेकठिकाणी जाळपोळ झाली. शिवाय, जालना शहरातही शनिवारी जाळपोळ झाली होती.

आंदोलनकांनी दगड फेक केली होती. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून, त्यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तर अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे आणि डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर लगेच शैलेश बलकवडे यांनी दुपारी पदभार स्वीकारला आहे.

Web Title: Shailesh Balakwade is the new SP of Jalana; Assumed charge immediately after instructions from Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.