शेगाव- पंढरपूर दिंडी महामार्गाचा दर्जा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:38 AM2018-12-24T00:38:56+5:302018-12-24T00:39:07+5:30

शेगाव- पंढरपूर सिमेंट महामार्गाला तडे गेले असून काम नियमाप्रमाणे होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रविवारी दुपारी लोणार रोडवर सुरू असलेले काम बंद पाडले.

Shegaon-Pandharpur Dindi highway work quality has declined | शेगाव- पंढरपूर दिंडी महामार्गाचा दर्जा घसरला

शेगाव- पंढरपूर दिंडी महामार्गाचा दर्जा घसरला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : शेगाव- पंढरपूर सिमेंट महामार्गाला तडे गेले असून काम नियमाप्रमाणे होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रविवारी दुपारी लोणार रोडवर सुरू असलेले काम बंद पाडले.
शेगाव -पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम सुरु आहे. मेघा कंन्ट्रक्शन ही कंपनी रस्त्याचे काम करीत आहे. या कंपनीने खोदकाम व मुरुमाची कामे इतरांना करण्यासाठी दिल्याने कामे नियमाप्रमाणे होत नाहीत. सध्या मेघा कन्स्ट्रक्शनकडून डीएलसी व पीक. व्ही.सी कामेही नियमाप्रमाणे होत नसल्याचा तक्रारी आहेत. शेगाव -पंढरपूर सिमेंट महामार्गालातडे गेल्याचा तक्रारी लोणीकर यांच्याकडे करण्यात आल्या. या तक्रारीची दखल बबनराव लोणीकर यांनी गुणवत्ता राखा अन्यथा बुलडोजर खाली घालू असा दमही संबंधितांना दिला होता. मात्र, तरीही कोणतेच बद्दल न करता मेघा कंन्ट्रक्शनकडून कामे उरकण्याचा सपाटा लावला.
रात्रीच कामे सुरु असून याकडे एमएसआरडी विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.
सिमेंट रस्त्याला तडे गेल्याने रविवारी दुपारी लोणार रोडवर सुरू असलेले काम बंद पाडले. यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे, सामाजिक कार्यकर्ते कैलास खंदारे, युवा सेनेचे माऊली सरकटे, राष्ट्रवादीचे दिगंबर इक्कर, भाजपाचे दत्तराव कांगणे, दिगंबर कागणे, मनसेचे भागवत मुर्तडकर, नंदू सरकटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित
होते.

Web Title: Shegaon-Pandharpur Dindi highway work quality has declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.