शिवसेनेकडून ५१ महिलांना पाच लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:40 AM2021-06-16T04:40:08+5:302021-06-16T04:40:08+5:30

यावेळी सत्तार म्हणाले की, शिवसेनेने आता आगामी पालिका निवडणुकांकडे लक्ष देऊन पालिकेवर भगवा फडकवावा, तसेच अंबेकर यांनी जो पुढाकार ...

Shiv Sena provides Rs 5 lakh to 51 women | शिवसेनेकडून ५१ महिलांना पाच लाखांची मदत

शिवसेनेकडून ५१ महिलांना पाच लाखांची मदत

Next

यावेळी सत्तार म्हणाले की, शिवसेनेने आता आगामी पालिका निवडणुकांकडे लक्ष देऊन पालिकेवर भगवा फडकवावा, तसेच अंबेकर यांनी जो पुढाकार घेऊन शेतकरी महिलांचे अश्रू पुसण्याचे काम केले ते संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल, असेही सत्तार यांनी सांगितले.

यावेळी संपर्क नेते घोसाळकर यांनी सांगितले की, घर बांधताना कोणीच कसूर ठेवत नाही; परंतु अंबेकर यांनी इंटेरियवर होणारा अधिकचा पैसा बचत करून तो शेतकऱ्यांचे दायित्व निभावून शिवसेनेचे खरे तत्त्व अंगीकारल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिहर शिंदे यांनी केले.

चौकट

शिवसैनिकांनी जनतेत जावे

शिवसेनेचा आत्मा हा शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपणारे नेते आहेत. पीक विम्याच्या मुद्यासह कृषिकर्ज देण्यासाठी ठाकरे यांनी जे निर्णय घेतले आहेत, त्याची माहिती शिवसैनिकांनी जनतेत जाऊन सांगावी, भाजपच्या बोलघेवड्या नेत्यांना यातून शह देणे शक्य होणार आहे.

अर्जुन खोतकर, माजी मंत्री,

चौकट

अशी वेळ कोणावरही येऊ नये

कोरोनाने संपूर्ण जग हादरले आहे. या आजाराने अनेकांच्या डोक्यावरील छत्र गेले, तर कोणाच्या कपाळवरील कुंकू पुसले आहे. त्याचा सर्वांत मोठा फटका हा कष्टकरी शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आपण दौरे करताना अनेकांचे दु:ख जवळून पाहिले. त्यातूनच आपण समाजाचे देणे लागतो या वृत्तीतून घराच्या इंटेरियरवरील खर्च कमी करून तेच पाच लाख रुपये गोरगरिबांच्या मदतीसाठी दिले आहेत, त्याचे एक आत्मिक समाधान आहे. यातून आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेच धोरण राबविले आहे.

भास्कर अंबेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख, जालना

Web Title: Shiv Sena provides Rs 5 lakh to 51 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.