मंठा नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:01 AM2018-05-24T01:01:06+5:302018-05-24T01:01:06+5:30
मंठा येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन राठोड यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे सिराजखाँ कलंदरखाँ पठाण यांची झाली.
सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी काम पाहिले. सभागृहात एकूण १७ सदस्यांपैकी शिवसेनेचे पाच, काँग्रेसचे पाच, असे दहा सदस्य हजर होते. तर भाजपाचे तीन आणि शिवसेनेचे चार सदस्य सभागृहात गैरहजर होते. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पदांसाठीचा निकाल जाहीर केला.
विजयी उमेदवारांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी स्वागत केले. शहरातील नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यास शिवसेना कटीबद्ध असल्याचे बोराडे या वेळी म्हणाले. तर भाजपाच्या हुकुमशाही विरुद्ध सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन जेथलिया यांनी केले.माजी सभापती राजेश राठोड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, अंकुशराव अवचार, हरिभाऊ चव्हाण, श्रीरंगराव खरात, संतोष वरकड, प्रसाद बोराडे, किसन मोरे, कय्युम कुरेशी, प्रा. माणिक थिटे, बेबी पावसे, गयाबाई पवार, बालासाहेब बारोडे, मुसा कुरेशी, शेख जलील, संजय राठोड, प्रल्हादराव बोराडे, सुरेशराव सरवदे, इलियास कुरेशी, निरज सोमाणी, अरुण वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती.