विविध उपक्रमांनी शिवाजी महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:19 AM2019-02-20T00:19:54+5:302019-02-20T00:20:17+5:30
जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅली, ढोलपथक, लेझीमच्या निनादात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती.
महाराष्ट्र हायस्कूल
जालना : येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही.बी. धावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एस.डी. राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास सह शिक्षक आर.एस. खरात, ए.आर. धांडे, एस.बी. पडोळ, एम.जी. क्षीरसागर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
ज्ञानज्योत विद्यालय
जालना : ज्ञानज्योती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय योगेशनगर व जेमस्टोन वर्ल्ड स्कूल जालना येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बाबासिंग बायस हे होते. यावेळी प्रा. भराटे, मुख्याध्यापक संजय सरकटे, एन.आर. हिवाळे, आर.बी. मालुसरे, व्ही.व्ही. गाटोळे यांच्यासह एन.आर. हिवाळे, एस.व्ही. उगले, डी.पी. डिघोळे आदींची उपस्थिती होती.
जिजाऊ ब्रिगेडची रॅली
जालना : जिजाऊ ब्रिगेड जालनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत अध्यक्षा विभावरी ताकट, प्रमुख मार्गदर्शक संतोष गाजरे, संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष, विजय वाडेकर, सचिव राजू मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या शीतलताई तनपुरे, सचिव पूजा लोंढे, शहराध्यक्षा सीमा गंगाधरे, शिवाजी तनपुरे, काकासाहेब खरात, अमोल चव्हाण, सायली गाजरे, शारदा ताकट आदींची उपस्थिती होती.