युवा संसद वक्तृत्व स्पर्धेत शिवानी सिरसाट, हर्षल व्यवहारे अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:41 AM2020-12-30T04:41:34+5:302020-12-30T04:41:34+5:30
जालना : नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संसद वक्तृत्व स्पर्धेत शिवानी ...
जालना : नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संसद वक्तृत्व स्पर्धेत शिवानी सिरसाट व हर्षल व्यवहारे यांनी बाजी मारली आहे, तर संदीप जरक यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.
नेहरू युवा केंद्र जालना व राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत जिल्हास्तरीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा मंगळवारी राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात पार पडली.
या स्पर्धेत शिवानी सिरसाट प्रथम, तर हर्षल व्यवहारे द्वितीय आला आहे, तर संदीप जरक याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. पहिल्या दोन विजेत्यांना आता राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सुनंदा तिडके, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. प्रा. सोमीनाथ खाडे, प्रा. डॉ. भीमराव वाघ, प्रा. डॉ. दादासाहेब गिऱ्हे, मिलिंद सावंत, बाळासाहेब देशमुख, जयपाल राठोड, रघुवीर गुढे, गणेश वर्पे आदींची उपस्थिती होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. भीमराव वाघ व प्रा. दादासाहेब गिऱ्हे यांनी कामकाज पाहिले.