कांदा, सोयाबीन शेतीचा शिवनी पॅटर्न, शेतकऱ्यांना होतोय चांगलाच फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 09:01 AM2023-01-02T09:01:23+5:302023-01-02T09:06:33+5:30

राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

Shiwni pattern of onion in jalana, soybean farming, farmers are benefiting | कांदा, सोयाबीन शेतीचा शिवनी पॅटर्न, शेतकऱ्यांना होतोय चांगलाच फायदा

कांदा, सोयाबीन शेतीचा शिवनी पॅटर्न, शेतकऱ्यांना होतोय चांगलाच फायदा

googlenewsNext

जालना / रामनगर : बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात आला आहे. दरवर्षी संकटाचा सामना करावा लागत आहे. परंतु, अशा परिस्थितीचा सामना करत जालना तालुक्यातील शिवनी येथील प्रयोगशील शेतकरी उद्धव खेडेकर यांनी आधुनिक शेती, नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरून आपली शेती समृद्ध केली असून, विक्रमी उत्पादन काढून दाखवले आहे. त्यांच्या कांदा आणि सोयाबीन लागवडीच्या पॅटर्नची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

कांदा हे त्यांचे प्रमुख पीक आहे. त्यांनी एकरी २५० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग केले आहेत. त्यातून, अनेक युवकांनी प्रेरणा घेतली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन ही किमया केली आहे. सोयाबीन पिकाला पाणी कमी-जास्त केल्याने उत्पादनात घट होते. मात्र, बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे १२ ते १५ क्विंटलपर्यंत एकरी उत्पन मिळू शकते. पाणी व्यवस्थापनासाठी पाणी अडवणे, बंधारे बांधणे तसेच पाऊस किती पडतो याचा अभ्यास करून त्यानुसार पीक घेतल्याने उत्पादन वाढल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या शेतीची परिसरातील शेतकऱ्यांनी पाहणी करुन त्यांच्या शेतीचे तंत्र समजून घेतले आहे. आता, त्यांनाही त्याचा फायदा होईल.


शेडनेटमध्ये खरबूज लागवडीचा प्रयोग

■ खरबूज पिकासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी खेडेकर यांनी शेडनेटमध्ये खरबूज लागवडीचा प्रयोग केला. खरबूज पीक जमिनीवर न घेता शेडनेटमध्ये तारांवर घेतले.
■ हा प्रयोग यशस्वी ठरला. एका फळाचे वजन जवळपास दीड ते दोन किलो आले आहे. ही फळे पॅकिंग करून त्यांनी विदेशात विकली. त्यांच्या या प्रयोगाची जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी पाहणी करून कौतुक केले.

वाफा पद्धतीने कांद्याची शेती

पारंपरिक पद्धतीने कांदा न लागवड करता वाफा पद्धतीने ठिबक सिंचनद्वारे कांदा लागवड त्यांनी केली. सन २०१७ मध्ये त्यांनी एकरी अडीचशे क्विटल एवढे उत्पादन काढले. कांदा लागवडीसाठी रोपांची व्यवस्थित निवड करणे, पीक संरक्षणासाठी एकात्मिक पीक संरक्षण, एकात्मिक स्वत व्यवस्थापन करून त्यांनी हे उत्पादन मिळविले आहे.

Web Title: Shiwni pattern of onion in jalana, soybean farming, farmers are benefiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.