अंबडमध्ये तीन अल्पवयीन भावंडांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 23:20 IST2024-04-14T23:20:07+5:302024-04-14T23:20:38+5:30
एकाच कुटुंबातील ६, ८ आणि १२ वर्षांच्या भावंडांची मृतदेह आढळल्याने गावांत खळबळ उडाली आहे

अंबडमध्ये तीन अल्पवयीन भावंडांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ
अंबड ( जालना) : तालुक्यातील डोमेगाव शिवारात एका विहिरीत रविवारी दुपारी दोन मुली, एक मुलगा अशा तीन बालकांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सोहम संतोष ताकवले(१२), शिवानी संतोष ताकवले(८), दीपाली संतोष ताकवले(६) अशी मृत बालकांची नावे आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणीअंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोपीला लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी दिली आहे.