धक्कादायक ! एकाच महिन्यात २४ शेतकऱ्यांनी संपविली जीवन यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 01:16 PM2021-07-30T13:16:06+5:302021-07-30T13:18:23+5:30

farmer suicide News : नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे.

Shocking! In a single month, 24 farmers completed their life journey | धक्कादायक ! एकाच महिन्यात २४ शेतकऱ्यांनी संपविली जीवन यात्रा

धक्कादायक ! एकाच महिन्यात २४ शेतकऱ्यांनी संपविली जीवन यात्रा

Next
ठळक मुद्देसात महिन्यांत ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्याकोरोनामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

- दीपक ढोले
जालना : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. मात्र, असे असले तरी जूनच्या एकाच महिन्यात जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. गत सात महिन्यांत ५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. (  In a single month, 24 farmers completed their life journey) 

नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे. २००१ ते २०२१ या काळात तब्बल ७४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चौकशी केल्यानंतर यातील ६२९ पात्र, तर ११३ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात, यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र, यातील किती योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला, यावर वाद-विवाद सुरूच आहे. असे असले तरी शेतकऱ्यांमागे लागलेले समस्यांचे शुक्‍लकाष्ठ काही संपलेले नाही. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी अशा संकटात शेतकरी कायमच अडकलेला आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटातही शेतकरीच जास्त भरडला जात आहे. कोरोना काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. २०२० साली ८८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे, तर मागील सात महिन्यात ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या जून महिन्यात २४ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपविली असून, त्यापैकी ४६ आत्महत्या पात्र ठरविण्यात आले आहेत.

कोरोनामुळे शेतकरी अडचणीत
रब्बी हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना या काळातील पीक एकतर कवडीमोल भावाने विकण्याची; तर काहींवर अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकरी या काळातही अडचणीत आला होता. देश लॉकडाऊन असताना शेतकरी आपल्या शेतातील माल विकावा कसा, या मानसिकतेत होते. यामुळेच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

सात महिन्यांत ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जानेवारी ते जुलै या काळात जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ४६ शेतकरी आत्महत्या पात्र ठरल्या असून, ४ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. येणाऱ्या काळात शेती तसेच शेतकरी या वर्गाला कसा दिलासा देता येईल, याचा विचार होणे आता गरजेचे झाले आहे.

गेल्या सात महिन्यात झालेल्या आत्महत्या
महिना             एकूण आत्महत्या
जानेवारी                        ०८
फेबुवारी                         ०३
मार्च                         ०४
एप्रिल                         ०२
मे                         ०४
जून                         २४
जुलै                         ०५
 

Web Title: Shocking! In a single month, 24 farmers completed their life journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.