ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:40 AM2018-11-15T00:40:23+5:302018-11-15T00:40:59+5:30
ठाण बु. येथे पंतप्रधान घरकुल आवास योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी २५ ते ३० महिला व पुरुषांनी बुधवारी शाबीर अली चौकातील नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईलने आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील बठाण बु. येथे पंतप्रधान घरकुल आवास योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी २५ ते ३० महिला व पुरुषांनी बुधवारी शाबीर अली चौकातील नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईलने आंदोलन केले.
पंतप्रधान आवास घरकुल योजनेत भ्रष्टाचाराची सरपंचाच्या मदतीने बोगस चौकशी केल्याच्या कारणावरुन जालना तालुक्यातील बठाण बुद्रूक येथील ग्रामस्थ व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शहरातील उड्डाणपुलाजवळील जलकुंभावर चढून शोलेस्टाईलने आंदोलन केले.
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी आंदोलकांशी चर्चा करुन याबाबत आज बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलनाची सांगता केली.