३५ बीएलओंना बजावली कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:57 AM2018-06-16T00:57:41+5:302018-06-16T00:57:41+5:30
जालना विधानसभा मतदार संघात तब्बल ३७ हजार ८४३ मतदारांचे यादीत छायाचित्रच नसल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जालना तालुक्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या कामात हलगर्जीपणा केल्याने तहसीलदार बिपीन पाटील यांनी ३५ बीएलाओंना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने कर्मचाऱ्यांत धास्ती पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना विधानसभा मतदार संघात तब्बल ३७ हजार ८४३ मतदारांचे यादीत छायाचित्रच नसल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जालना तालुक्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या कामात हलगर्जीपणा केल्याने तहसीलदार बिपीन पाटील यांनी ३५ बीएलाओंना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने कर्मचाऱ्यांत धास्ती पसरली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुका निहाय मतदार याद्या दुरुस्ती करण्याचे काम तहसील कार्यालयाने हाती घेतले आहे.यासाठी ३९० बीएलओंची नियुक्ती केली आहे. दीड महिन्यात चावडी वाचन आणि मतदार याद्यात दुरूस्ती करण्यात येत आहे. जालना विधानसभा मतदार संघात २९७ मतदारसंघात ३ लाख ६ हजार ६७ मतदार आहेत. यामध्य्ये १ लाख ४२ हजार १८० पुरूष, १ लाख ६३ हजार ८८७ महिला मतदार आहेत. त्यापैकी तब्बल ३७ हजार ८४३ मतदारांचे याद्यात फोटो नाहीत.निवडणूक आयोगाने जूने एमटी सिरिजचे कार्ड ऐवजी टप्याटप्याने स्मार्ट मतदान कार्ड मतदारांना देण्यासाठी निवडणूक आयोगाने मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून तहसीलच्या निवडणूक विभागाने जालना मतदार संघातील २९७ मतदार केंद्रावर २० एप्रिलपासून ३९० बीएलओ,३६ तलाठी, ३६ एरिया प्रमुख कर्मचाºयामार्फेत मतदार यादी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातील ३६ मतदान केंद्रावर मतदान याद्याचे नागरिकासमोर वाचन करण्यात आले आहे. यात नागरिकांचे आक्षेप बारा हजार मतदारांचे रंगीत फोटो जमा करण्यात आले. मात्र दीड महिन्यात फक्त बारा हजार फोटो जमा झाले तसेच मतदार याद्याचे काम संथगतीने सुरू असल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.बी.खपले यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या अधिकारी कर्मचाºयांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती.
कामात हलगर्जीपणा करणाºया कर्मचाºयांचे निलंबन करण्याचे आदेश खपले यांनी दिले होते. यामुळे तहसीलदार पाटील यांनी कामात हलगर्जीपणा करणाºया बीएलआेंना नोटीस पाठवून याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे कर्मचा-यांत एकच धास्ती पसरली आहे.