श्रीगुरुचरित्र ग्रंथ म्हणजे प्रमाणभूत- भास्कर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:38 AM2018-12-21T00:38:35+5:302018-12-21T00:39:12+5:30

श्रीगुरुचरित्र ग्रंथ म्हणजे प्रमाणभूत- भास्कर महाराज

Shri Gurucharitra Granth is the standard - Bhaskar Maharaj | श्रीगुरुचरित्र ग्रंथ म्हणजे प्रमाणभूत- भास्कर महाराज

श्रीगुरुचरित्र ग्रंथ म्हणजे प्रमाणभूत- भास्कर महाराज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : प्रमाणभूत वाटणारा मराठी ग्रंथ म्हणजे श्रीगुरुचरित्र होय. या ग्रंथात एकूण बावन्न अध्याय असून दत्तांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा नृसिंह सरस्वती व तिसरा अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, असे सांगतात. त्यातील पहिला अवतार श्रीपाद वल्लभ यांनी कृष्णा पंचगंगा संगमावर नृसिंहवाडी येथे जपानुष्ठान केले. भीमा अमरजा संगमावर गाणगापूर येथे त्यांचे वास्तव्य चोवीस वर्षे होते. त्यामुळे गाणगापूरला दत्तपंथीयांत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. असे प. पूज्य, भास्कर महाराज देशपांडे यांनी नुकतेच सांगितले आहे.
येथील नवनाथ संस्थान मध्ये प. पूज्य भास्कर महाराज देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प. पूज्य प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकर यांच्या आशीर्वादाने दत्त जयंती सप्ताह निमित्त गुरूचरित्र, नवनाथ, पारायण वाचन, नामस्मरण या सह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. संगीत नवनाथ कथासार व भागवताचार्य पुरुषोत्तम कुलकर्णी हे वाचन करीत आहेत.
दत्त महिमा आणि गुरुचरित्र महिमा कथा भास्कर महाराज सांगत आहेत. यावेळी काही हितोउपदेश देतांना ते म्हणाले, योग, ज्ञान, वैराग्य, सातत्य, चिकाटी, चमत्कार व कडक शिस्त व शिस्तीचे कडक आचरण म्हणजे गुरुचरित्र होय. भक्ती, मुक्ती अनन्यसाधारण भरवसा (विश्वास) ठेवण्याचा प्रयत्न करून साकरल्याने विचार करावयास लावणारे दैवत आहे. असेही त्यांनी सांगितले.
पारायण वाचनास प. पूज्य. भास्कर महाराज, यांच्यासह दत्ता देशपांडे, भगवान देशपांडे, सखाराम देशपांडे, भक्तीताई देशपांडे, भैरवी देशपांडे, भावना देशपांडे, भागर्वी देशपांडे, पार्वती चौथाईवाले, चिन्मय चौथाईवाले, व्यंकटेश जोशी, कौशल देशपांडे, निखिल देशपांडे, शंतनू देशपांडे, सोनू महाराज मुळे, प्रताप महाराज जोशी, कपिल शर्मा, महेश जोशी, राजेंद्र कड, प्रदीप जोशी, प्रवीण कड, विकास साळी, महेश खडके, संजय कंठाले, नितीन दंडनाईक आदींचा समावेश आहे. शनिवारी दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात येईल.

Web Title: Shri Gurucharitra Granth is the standard - Bhaskar Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.