ग्रामपंचायतींमध्ये शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:59 IST2019-09-06T00:59:03+5:302019-09-06T00:59:16+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने विविध मागण्यांसाठी मागील १४ दिवसांपासून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

ग्रामपंचायतींमध्ये शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने विविध मागण्यांसाठी मागील १४ दिवसांपासून आंदोलन पुकारण्यात आले आहे. या संपात जिल्ह्यातील ५५१ ग्रामसेवकांनी सहभाग घेतल्याने ग्रामपंचायतीची कामे ठप्प झाली आहे.
मागील १४ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने सरकारच्या विरोधात आणि आपल्या न्याय, हक्क मागण्यासंर्दभात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा सामान्य जनतेला मात्र नाहक फटका बसत आहे. ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील विकास कामे खोळंबल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
शासनाच्या विविध योजनांचे अर्ज दाखल करण्यासाठी लाभार्थी धावपळ करीत असताना सुध्दा शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. युनियनच्या वतीने २२ आॅगस्टपासून आंदोलनाला सुरुवात केली असून, मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामसेवकांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
ही कामे आहेत ठप्प
टेंडर, एमआरजीएसची सर्व कामे, सर्व शासकीय योजनांची कामे, ग्रामस्थांची दैंनदिन कामे, शालेय कामे, काही दिवसातच आचार संहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे शासनाचा निधी अखर्चीत राहण्याची शक्यता आहे.
पाणीटंचाईची स्थिती आदी कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.