वर्षभरापासून जालना- ममदाबाद रस्त्यावरील साईडपट्ट्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:21+5:302021-03-05T04:30:21+5:30
जालना : तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा राज्यमार्ग १८१ जालना ते ममदाबाद या राज्य मार्गावरील कचरेवाडी, वानडगाव, खणेपुरीपर्यंत साईडपट्ट्या भरण्याचे ...
जालना : तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा राज्यमार्ग १८१ जालना ते ममदाबाद या राज्य मार्गावरील कचरेवाडी, वानडगाव, खणेपुरीपर्यंत साईडपट्ट्या भरण्याचे काम गेल्या एक वर्षापासून रखडले आहे. यामुळे रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहे. या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जालना तालुक्यातील जालना ते ममदाबाद हा महत्त्वाचा रस्ता असून, तो दोन मतदारसंघात विभागाला आहे. या रस्त्याने अनेक गावांना ये-जा करता येते. त्यामुळे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वर्षभरापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने साईडपट्ट्याचे कामही हाती घेतले होते. काही ठिकाणी कामही पूर्ण झाले आहे. परंतु, कचरेवाडी, वानडगाव, खणेपुरीपर्यंत साईडपट्ट्या भरण्याचे अद्यापही झाले नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित विभागाने कोणतेही नियोजन न करता रस्त्याच्या दुर्तफा खोदकाम केले होते. आता चारचाकी वाहनांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरील साईडपट्ट्या भरण्याचे काम थांबविण्यात आले होते. त्यानंतरही काम कधी बंद तर कधी सुरू राहत आहे. या रस्त्याचे साईडपट्ट्या तातडीने भरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
===Photopath===
040321\04jan_1_04032021_15.jpg
===Caption===
साईट पंखे भरण्याचे काम न झाल्याने वाहनधारकांना अशी कसरत करावी लागत आहे.