जालन्यात रेशीम महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:59 AM2019-08-31T00:59:13+5:302019-08-31T00:59:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : स्टीलनगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यात नाजूक रेशीम धाग्यांपासून निर्मित विविध आकर्षक साडी, वस्त्र तसेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्टीलनगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यात नाजूक रेशीम धाग्यांपासून निर्मित विविध आकर्षक साडी, वस्त्र तसेच अन्य साहित्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उप्रकम रेशीम दिनाचे (१ सप्टेबर हा रेशी दिन) म्हणून साजरा होतो. याचे औचित्य साधून ठेवण्यात आला आहे. याचे उद्घाटन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमा अंतर्गत रविवारी महाराष्ट्रातील पहिली रोशीम कोष खरेदी बाजारपेठ इमारतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक वस्त्रो उद्योगमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.
सदरील कार्यक्रम जालन्यातील शाम लॉज समोरील जुन्या मोंढ्यात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण, वस्त्रोउद्योग विभागाचे सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, सीईओ नीमा अरोरा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी (ता. ०१ ) सकाळी ८ ते १० या वेळेत रेशीम रथ यात्रा निघणार आहे. भोकरदन नाका येथून रथयाञेस प्रारंभ होऊन जुना मोंढा भागातील महोत्सव स्थळी पोहोचेल.
रविवारी सकाळी १०.०० वा. सिरसवाडी मार्गावरील आयकर विभाग कार्यालयासमोर रेशीम कोष बाजार पेठेच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वस्ञोद्योग व पणन मंञी राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्ष स्थानी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, महाराष्ट्र वित्त महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, गोदावरी महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर अंबेकर, आ विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. अंबादास दानवे, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.