साहेब, बस गावात आणा ना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:43 AM2018-01-02T00:43:24+5:302018-01-02T00:43:24+5:30

बसगाड्या स्थानकात न येता टी-पॉर्इंटवरूनच परत जात असल्याने येथील ग्रामविकास मंचच्या युवकांनी सोमवारी गांधीगिरी करत बाहेरूनच बस वळविणा-या चालकाचे हार घालून स्वागत केले.

Sir, please take the bus to the village! | साहेब, बस गावात आणा ना !

साहेब, बस गावात आणा ना !

googlenewsNext

कुंभार पिंपळगाव : बसगाड्या स्थानकात न येता टी-पॉर्इंटवरूनच परत जात असल्याने येथील ग्रामविकास मंचच्या युवकांनी सोमवारी गांधीगिरी करत बाहेरूनच बस वळविणा-या चालकाचे हार घालून स्वागत केले. एवढ्यावरच न थांबता बसलाही हार घातला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या आंदोलनाची चर्चा गावात दिवसभर सुरू राहिली.
पाथरी आगाराची पाथरी-अंबड व जालना आगाराची जालना-जांबसमर्थ या बसेस कुंभार पिंपळगाव बसस्थानकासाठी निघतात. मात्र, गावाबाहेरील अंबड-पाथरी टी पॉइंट वरुनच परत जातात. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होते. सोमवारी सकाळी अंबड पाथरी बस (एमएच २० बीएल २३८९ ) स्थानकात न येताच काही अंतरावरूनच परत जात असताना येथील ग्रामविकास मंचचे भागवत राऊत, सिद्धेश्वर कंटुले, दिनेश दाड, महारुद्र गबाळे, मल्लिनाथ बुरशे, महावीर व्यवहारे, सुरेश कंटुले, शिवाजी जायभाये, बाळू व्यवहारे, कुलकर्णी आदींनी ही बस थांबवली. चालक अर्जुन तुकाराम बागल व वाहक ए. टी. खरते यांना खाली उतरवून त्यांचा हार घालून सत्कार केला. त्यानंतर बसलाही हार घालून युवकांनी चालक बागल यांना बस स्थानकात घेऊन येण्याची विनंती केली.
------------
पत्रालाही केराची टोपली
अंबड पाथरी बस स्थानकात आणावी यासाठी कुंभारपिंपळगाव स्थानक प्रमुखांनी संबंधित आगार प्रमुखांना पत्र दिले आहे. मात्र, चालक-वाहकांकडून या पत्राची दखल घेतली जात नाही.
------------^^^^^
कुंभार पिंपळगाव बसस्थानकातून घनसावंगी, अंबडकडे जाणा-यांची गर्दी असते. यात विद्यार्थ्यांची संख्याही अधिक असते. मात्र, चालक मनमानी करत बाहेरूनच गाड्या वळवतात. या पूर्वी वारंवार निवेदने देऊनही काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे नववर्षाला चालक-वाहकांचे स्वागत करून बस स्थानकात आणण्याची विनंती केली.
भागवत राऊत, कुंभार पिंपळगाव.

Web Title: Sir, please take the bus to the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.