बहिणीची सासरी पाठवणी केली अन भावाने संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 06:10 PM2021-03-12T18:10:33+5:302021-03-12T18:11:55+5:30

भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात रंजनाबाई सुभाष गंगतीरे या तीन मुली व दोन मुलांसोंबत भाड्याचे घर घेऊन राहतात.

Sister sent to home and brother ended his life | बहिणीची सासरी पाठवणी केली अन भावाने संपवले जीवन

बहिणीची सासरी पाठवणी केली अन भावाने संपवले जीवन

Next

भोकरदन : शहरात दोन दिवसांपूर्वीच बहिणीचा विवाह समारंभ आटपून घरात आनंदाचे वातावरण असताना भावाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. राहुल उर्फ विक्की सुभाष गगतिरे ( 19, रा विरेगाव ह.मु. भोकरदन ) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमुळे बहिणीला सासरी पोहचत नाही तोच भावाच्या अंत्यविधीसाठी परतावे लागले. 

भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात रंजनाबाई सुभाष गंगतीरे या तीन मुली व दोन मुलांसोंबत भाड्याचे घर घेऊन राहतात. पतीचे निधन झाले असल्याने त्या विरेगाव येथे भावाकडे राहत होत्या. मात्र, खेड्यात मुलांचे शिक्षण होणार नाही म्हणून त्यांनी भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात भाड्याने घर घेतले. येथे हाताला मिळेल ते काम करून रंजनाबाई यांनी मुले मोठी केली. राहुलचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले होते. गेल्या वर्षी राहुल औरंगाबाद येथील कंपनीत कामासाठी गेला होता. मात्र लॉकडाऊनमुळे गावाकडे परत आला होता. आज सकाळी राहुल प्रातःविधीसाठी बाहेर पडला आणि परतलाच नाही. शोध घेतला असता त्याचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.  

दरम्यान, 10 मार्च रोजी राहुलची बहीण संजना हिचा सिन्नर येथील समाधान लाड यांच्याशी विवाह पार पडला. वऱ्हाडी मंडळी त्यांच्या गावी पोंहचत नाही तोच बहीण संजना हिला भावाच्या निधनाची माहिती मिळाली.  त्यामुळे संजनाला आनंदी वातावरणातून शोकाकुल वातावरणात भावाच्या अंत्यविधीसाठी परत यावे लागले आहे. घटनास्थळी भोकरदन पोलिस ठाण्याचे कर्मचारी के बी दाभाडे,  अनिल जोशी यांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. त्याच्या पक्षात आई, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Sister sent to home and brother ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.