साष्टपिंपळगाव येथील ठिय्या २९ व्या दिवशी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:57 AM2021-02-18T04:57:51+5:302021-02-18T04:57:51+5:30
शहागड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साष्टपिंपळगाव येथे सुरू करण्यात आलेले आंदोलन बुधवारी २९ व्या दिवशीही सुरूच होते. मराठा समाजाच्या ...
शहागड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साष्टपिंपळगाव येथे सुरू करण्यात आलेले आंदोलन बुधवारी २९ व्या दिवशीही सुरूच होते. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेत नसल्याने आंदोलकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे गत २९ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले; परंतु अद्याप सकारात्मक निर्णय शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे आंदोलकांनी संताप व्यक्त केला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी गणेश महाराज बोचरे, अशोक बाबासाहेब औटे, अशोक प्रभाकर गढेकर, रवींद्र कैलास वैद्य, बप्पा सदाशिव डोंगरे, बाबासाहेब भगवान ढेरे, आयुब मुनीरभाई शेख
आदींची उपस्थिती होती.
फोटो