तीन आरोपींना सहा दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 01:11 AM2019-10-10T01:11:10+5:302019-10-10T01:11:24+5:30

शेलगाव येथील संजय अंभोरे यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्या प्रकरणात अटक केलेल्या तीन आरोपींना दि १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली

Six-day jail term for three accused | तीन आरोपींना सहा दिवसांची कोठडी

तीन आरोपींना सहा दिवसांची कोठडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्या प्रकरणात अटक केलेल्या तीन आरोपींना दि १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान आरोपींनी फायर केलेल्या राऊंडच्या दोन पुंगळ्या सापडल्या आहेत.
शेलगाव येथील संजय किसनराव अंभोरे (४२) यांचा सोमवारी रात्री दुचाकीवर आलेल्या मारेकऱ्यांनी गोळीबार करून खून केला होता. या प्रकरणात त्यांचे बंधू राजू किसनराव अंभोरे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून सुमेरसिंग काकरवाल ठेकदार, उत्तम घुनावत ठेकेदार, मदन खोलवाल (तिघे रा. राजेवाडी ता बदनापूर) व इतर दोन अनोळखी अशा एकूण पाच संशयित आरोंपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यापैकी सुमेरसिंग काकरवाल ठेकदार, उत्तम घुनावत ठेकेदार, मदन खोलवाल या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना बदनापूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Six-day jail term for three accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.