नोकरीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:09 AM2018-02-13T01:09:52+5:302018-02-13T01:09:56+5:30
औरंगाबाद येथील महावितरण विभागात नोकरीस लावून देतो म्हणून पाच लाख ९५ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाºया एका संशयितावर सोमवारी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना : औरंगाबाद येथील महावितरण विभागात नोकरीस लावून देतो म्हणून पाच लाख ९५ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाºया एका संशयितावर सोमवारी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील बाबूराव जाधव (रा.टीव्ही सेंटर, औरंगाबाद) असे फसवणूक करणा-या संशयिताचे नाव आहे. सुनील जाधव याने अंबड येथील भीमदेव दगडू पवार (५५, रा. अंबड) यांच्या मुलीस औरंगाबादच्या विद्युत विभागात नोकरी लावून देतो म्हणून पाच लाख ९५ हजार रुपये उकळले. मात्र, नोकरी न मिळाल्यामुळे विचारण्यास गेलेल्या भीमदेव पवार यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.
--------------
प्लॉट देतो म्हणून फसवणूक
अंबड-पाचोड मार्गावरील सर्वे क्रमांक ४०१ मध्ये ६०० स्वेअर फुटांचा प्लॉट ९५ हजार ७०० रुपयात देतो म्हणून एकाने धनगर पिंपरी (ता.अंबड) येथील ज्ञानेश्वर बाळाभाऊ उपासे (५३) यांची फसवणूक केली. या प्रकरणी उपासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित समाधान सर्जेराव शेजूळ (रा.खरपुडी), गिरधारी नंदलाल दायमा (रा.आरपी रोड, जालना) यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजपूत तपास करीत आहेत.
--------------