सहा महिने प्रशिक्षण, सहा महिने अ‍ॅप्रेंटिसशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:35 AM2019-01-22T00:35:41+5:302019-01-22T00:36:08+5:30

केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ३० उद्योजकांचे शिष्टमंडळ नुकतेच जर्मनी येथे आठ दिवस प्रशिक्षणासाठी गेले होते.

Six months training, six months of apprenticeship | सहा महिने प्रशिक्षण, सहा महिने अ‍ॅप्रेंटिसशिप

सहा महिने प्रशिक्षण, सहा महिने अ‍ॅप्रेंटिसशिप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ३० उद्योजकांचे शिष्टमंडळ नुकतेच जर्मनी येथे आठ दिवस प्रशिक्षणासाठी गेले होते. तेथील जीआयझेड या संस्थेच्या वरिष्ठ तज्ज्ञांकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले, यातील सीआयए संस्थेने कौशल्य विकास मंत्रालयास त्यांचा अभ्यासक्रमाचा आराखडा सादर केला आहे. त्यानुसार देशपातळीवरील आयटीआयमध्ये हा अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी लोकमत शी बोलताना दिली.
आजचे युग हे कौशल्यावर आधारित असल्याने ज्यांच्याकडे कला - गुण आहे, त्यांना या जगात यापूर्वीही महत्व होते आणि पुढेही राहणार आहे. जर्मनी येथे आठ दिवस राहिल्यावर तेथील वेगवेगळ्या शहरातील आयटीआयला भेट दिली. त्यावेळी तेथील आयटीआयमध्ये संबंधित उद्योगांचे तज्ज्ञ संचालक त्या आयटीआयचे व्यवस्थापन चालवितात. त्यामुळे उद्योगांना कोणत्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे याचा अंदाज त्या उद्योजकांना असतो. त्यामुळे भारतातही आता प्रत्येक आयटीआयमध्ये त्या भागातील उद्योजकांची एक समिती नेमण्यात येणार असून, ही समिती तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तशी समिती आता नेमण्यात येणार असून, ती तज्ज्ञांची राहणार आहे.
जर्मनी येथील आयटीआयचा अभ्यासक्रम हा तेथील सरकार ठरत नाही, तर त्या आयटीआयमध्ये असलेली उद्योजकांची समिती ठरवते. तसेच तेथील विद्यार्थ्यांनाही सहा महिने प्रशिक्षण आणि सहा महिने संबंधित उद्योगात काम असा पॅटर्न आहे. तो पॅटर्न आगामी काळात संपूर्ण देशातील आयटीआयमध्ये राबविला जाणार आहे. तसेच अ‍ॅप्रिंटस म्हणून पूर्वी संबंधित कारखाने हे केवळ एकवर्षच संधी देत असत, आता ही अ‍ॅप्रेंटिसची मर्यादा तीन वर्ष करण्याची शिफारसही सीआयएने केली आहे.या जर्मन दौऱ्यात प्रसाद कोकीळ, आशिष गर्दे हेही जर्मनीला गेले होते.
कुशल व्यक्तींना समाजात सन्मान मिळत नाही. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर, नुकताच जगातील सर्वात मोठा पुतळा सरदार वल्लभाई पटेल यांचा आहे. त्याचा जो ढाचा तयार केला आहे, तो सात रिश्चिटरचा भूकंप आल्यावरही त्याला काहीच धक्का लागणार नाही. परंतु तो ढाचा बनवणाºया कलाकाराचे कुठेच नाव समोर येत नाही. ते त्या कोनशिलेवर अन्य प्रमुख व्यक्तींच्या नावाप्रमाणे कोरले गेले पाहिजे,

Web Title: Six months training, six months of apprenticeship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.