सहा शिक्षकांना कामात निष्काळजीपणा भोवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:17 AM2020-02-07T01:17:14+5:302020-02-07T01:17:32+5:30
निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहा बीएलओंविरूध्द (शिक्षकांविरूध्द) तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहा बीएलओंविरूध्द (शिक्षकांविरूध्द) तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
संजय तिवारी, शिवाजी भोसले, रवींद्र खिल्लारे (नगर परिषद शाळा जालना), एस.के.केदारे (जिल्हा परिषद शाळा, जालना), व्ही.पी.पवार, यू.बी. टाकसाळे (दोघे सरस्वती भवन विद्यालय, जालना) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. जालना येथील मतदार नोंदणी अधिकारी यांनी वरील सहा बीएलओंना मतदार यादी भागातील प्रत्येक घरोघरी जाऊन भेटी देऊन संबंधित मतदारांचा तपशील वाचून दाखवून मतदाराचे पडताळणी बाबत निर्देश दिले होते. मात्र, संबंधितांनी या कामात जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण केले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.