"...तर ओबीसींचे ४०० कारखाने दिसले असते, २७-२८ वर्षांत काय मिळालं आम्हाला? लक्ष देऊन ऐका"; हाकेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:19 PM2024-06-21T19:19:54+5:302024-06-21T19:21:41+5:30

"या महाराष्ट्रात कालचं बजेटसुद्धा, म्हणजे अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा, ६० टक्के ओबीसींना १०० टक्क्यांपैकी १ टक्का बजेटही या महाराष्ट्राने राबवले नाही." 

So 400 OBC factories were seen, what did we get in 27-28 years Listen carefully Laxman Hake attacked on Manoj jarange | "...तर ओबीसींचे ४०० कारखाने दिसले असते, २७-२८ वर्षांत काय मिळालं आम्हाला? लक्ष देऊन ऐका"; हाकेंचा हल्लाबोल

"...तर ओबीसींचे ४०० कारखाने दिसले असते, २७-२८ वर्षांत काय मिळालं आम्हाला? लक्ष देऊन ऐका"; हाकेंचा हल्लाबोल

मिस्टर जरांगे, हू इज अ लॉ मेकर अँड हू इज अ लॉ इम्प्लिमेंटर? आमदार कोण? खासदार कोण आणि मुख्यमंत्री कोण? मराठेच ना? ओबीसींना एक टक्का बजेटही तुम्ही देत नाही. कुणी कुणाचं खायचा प्रश्न येतो. जरांगे, जर ओबीसींनी खाल्ल असेल, ७० वर्ष म्हणतोस तू, सोडून दे, २७-२८ वर्षांपूर्वी ओबीसींना आरक्षण मिळालं आहे. औबीसींनी रिझर्व्हेशन खाल्ल असतं, तर ओबीसींचे ४०० कारखाने दिसले असते. या महाराष्ट्रात २०० साखर कारखाने आहेत. १०० सहकारी आणि १०० खासगी त्यांतील १०-१५ कारखाने सोडले तर ९० टक्के कारखाने केवळ मराठा समाजाचे आहेत," अशा शब्दात ओबीसी आरक्षणाचे नेते लक्षमण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवला. ते जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे पत्रकारांशी बोलत होते.

१ टक्का बजेटही या महाराष्ट्राने राबवले नाही -
हाके म्हणाले, "७० वर्ष कुणाचे खाण्याचा प्रश्नच येत नाही आणि २७-२८ वर्षांत काय मिळाले आम्हाला? लक्ष देऊन सर्वांनी ऐका. ते नेहमीच आमचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना लक्ष करताना म्हणतात की, भुजबळ तू सगळ खाल्लय. या जरांगेंना माझा एक सवाल आहे, या महाराष्ट्रात कालचं बजेटसुद्धा, म्हणजे अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा, ६० टक्के ओबीसींना १०० टक्क्यांपैकी १ टक्का बजेटही या महाराष्ट्राने राबवले नाही." 

राजकीय कारकीर्द उद्धवस्त करण्यासाठी जनता आहे ना, तू कोण? -
"ओबीसी आणि मराठा समाजात काडी खऱ्या अर्थाने छगण भुजबळ यांनी लावली आहे, त्यांची राजकीय कारकिर्द उद्धवस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे जरांगे म्हणत आहेत, असे विचारले असता, हाके म्हणाले, "राजकीय कारकीर्द उद्धवस्त करण्यासाठी जनता आहे ना, तू कोण? राजकीय कारकीर्द उद्धवस्त करणार? या महाराष्ट्रातला ओबीसी, व्हीडेएनटी, एसबीसी, एक झाला आणि त्या लोकांनी स्वाभिमानाला मत दिलं, तर जरांगे काळ ठरवेल फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र काय आहे ते?" 

मग नक्की जातीयवादी कोण? -
"जरांगे यांच्या जातीवादासंदर्भातील विधानावर बोलताना हाके म्हणाले, जरांगे तुम्ही म्हणताय, जातीवाद केला नाही. भुजबळ असतील, लक्षमण हाके असेल, महादेव जाणकर असतील, गोपिचंद पडळकर असतील, मुंडे बंधू भगिणी असतील, वडेट्टीवार असतील, ही माणसं जाती उपजातींसह महाराष्ट्रातील ४९२ जातींची भाषा बोलतात आणि तुम्ही केवळ एकाच जातीची भाषा बोलत आहात. मग नक्की जातीयवादी कोण?" असा सवालही यावेळी हाके यांनी जरांगेंना केला.

    


 

Web Title: So 400 OBC factories were seen, what did we get in 27-28 years Listen carefully Laxman Hake attacked on Manoj jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.