चार केंद्रावर आतापर्यंत ८५ हजार क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:57+5:302020-12-30T04:40:57+5:30
अंबड : तालुक्यात कापसाचा हंगाम सुरू आहे. कापूस खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीवतीने तालुक्यात चार ठिकाणी सीसीआयची केंद्र ...
अंबड : तालुक्यात कापसाचा हंगाम सुरू आहे. कापूस खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीवतीने तालुक्यात चार ठिकाणी सीसीआयची केंद्र सुरू करण्यात आली आहे. या चार केंद्रावर आतापर्यंत ८५ हजार ७६८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने कापसाचे मोठे नुकसान झाले. यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट झाली. अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेल्या कापसाची वेचणी शेतकºयांनी केली. अनेक भागात पहिल्याच वेचणीत कापूस संपला. कमी उत्पादन झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातच खासगी व्यापारी बेभाव कापसाची खरेदी करीत होते. तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकºयांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व कृउबाचे सभापती सतीश होडे यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेऊन तालुक्यातील दुनगाव, शहागड, अंबड येथे दोन शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. ज्या शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यांचा कापूस खरेदी केला जात असल्याची माहिती कृऊबाचे सचिव बाबासाहेब सोळुंके यांनी दिली. मागील महिन्यापासून तालुक्यात कापसाची खरेदी केली जात आहे. दूनगाव येथील केंद्रात आतापर्यंत ११५५ शेतकºयांचा २९०७५.९० क्विंटल, अंबड येथील सुरज अॅग्रो येथे २७५ शेतकºयांचा ७३ ६०.४० क्विंटल तर शहागड येथील केंद्रात १७५४ शेतकºयांचा ३९८८२.६५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस खरेदी केंद्रावर ४४३ शेतकºयांचा ९४५१.२५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाबासाहेब सोळुंके यांनी दिली.
फोटो
शहागड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला कापूस.