चिमुकल्यांचे आजार बरे करणारा ‘हृद्य’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:25 AM2019-07-21T00:25:53+5:302019-07-21T00:26:26+5:30

रोटरी क्लब सेंट्रलच्या पुढाकारामुळे जालना जिल्ह्यातील हृदयाचे आजार असलेल्या ५२ लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Social program that cures the disease of smallpox | चिमुकल्यांचे आजार बरे करणारा ‘हृद्य’ उपक्रम

चिमुकल्यांचे आजार बरे करणारा ‘हृद्य’ उपक्रम

googlenewsNext

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आज मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांमध्ये देखील हृदयाचे आजार असल्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक गोरगरीब परिवार या अत्यंत महत्त्वाच्या आजाराकडे आर्थिक ऐपत नसल्याने दुर्लक्ष करतो. परंतु ही समाजातील नेमकी बाब हेरून रोटरी क्लब सेंट्रलने चार वर्षापूर्वी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारामुळे जालना जिल्ह्यातील हृदयाचे आजार असलेल्या ५२ लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आजही योजना रोटरी क्लब सेंट्रलचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यासाठी परिश्रम घेत असल्याची माहिती रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सीए वीरेंद्र देशपांडे यांनी दिली. असे असले तरी, या अनोख्या रूग्णसेवेसाठी सिंहाचा वाटा आहे, तो जालन्यातील डॉ. अनुप कासलीवाल यांचाच असल्याचे देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.
नेमका हृदयाशी निगडीत आजार कसा निवडला ?
आज समाजात अनेक आजारांनी थैमान घातले आहे. व्यसनांमुळे कर्करोग आणि जास्तीच्या ताण-तणावामुळे पक्षाघातासह मधुमेह हे आजार आता समाजाला पोखरत आहेत. परंतु वैद्यकीय व्यवसायात असल्याने अनेक लहान मुलांमध्येही हृदयाचे आजार जास्त असल्याचे दिसून आले. त्यात हृदयाला छिद्र असणे, हृदयाचा व्हॉल्व खराब असणे यामुळे देखील अनेक कुटुंब त्रस्त असल्याचे दिसून आले. त्यातच हृदयावरील आजारांवर उपचार पध्दतही देखील गरिबांना न परडवणारी असल्याचे आमच्या सर्व सदस्यांच्या लक्षात आले. त्यातूनच या गंभीर प्रकल्पाकडे वळलो.
आतापर्यंत किती जणांवर इलाज केले ?
गेल्या चार वर्षात जवळपास शंभरपेक्षा अधिक हृदय रूग्णांची तपासणी केली आहे. त्यातील ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. अशांवर मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी ज्यांची आर्थिक ताकद कमी आहे, अशांसाठी आम्ही कुठलेच शुल्क घेत नाही. इच्छा असल्यास संबंंधित मुला-मुलींच्या आई-वडिलांकडून नाममात्र रक्कम ती देखील देणगी म्हणून घेतली जाते.
या अत्यंत क्लिष्ट आणि खर्चिक शस्त्रक्रिया रोटरी क्लब सेंट्रल, कोकिळा बेन हॉस्पिटल आणि रोटरी क्लब आॅफ मुंंबई लेगर्स हा खर्च उचलतात.
आपण समाजात वावरत असताना अनेकांना काही ना काही आजार असल्याचे लक्षात येते. परंतु लहान मुलांमधील हा हृदयाचा आजार हा प्रथम त्यांच्या पालकांच्याच लक्षात येतो. परंतु न्यूनगंडामुळे अनेकजण आपल्या मुलाला हा आजार आहे, हे सांगण्यास घाबरतात. परंतु तसे न करता पालकांनी त्यांच्या मुलांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जागरुक राहावे..
मुलां-मुलींना हा आजार जडल्याची लक्षणे ही अत्यंत सहजरीत्या दिसतात. ज्या लहान मुलांना अर्थात वय एक ते दहा वर्ष असलेल्यांमध्ये चालताना दम लागणे, त्वचा निळसर पडणे, ज्या वयात जशी शारीरिक वाढ व्हावी तशी लक्षणे न दिसल्यास पालकांनी लगेचच तातडीने आपल्या मुलाल जवळच असलेल्या हृदयतज्ज्ञांकडे नेऊन तपासणी केल्यास हा गंभीर आजारही बरा होऊ शकते. हेच आमच्या आतापर्यंत ५२ जणांवर केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर लक्षात आले. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता. या आजाराला हिमतीने सामारे गेल्यास मुला-मुलांचे आजार निश्चित बरे होऊन ती अन्य मुलांप्रमाणे खेळू-बागडू शकतात, असा विश्वास आहे.

Web Title: Social program that cures the disease of smallpox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.