भगवाननगर शिवारातील ज्वारीचे पीक बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:28 AM2021-01-21T04:28:40+5:302021-01-21T04:28:40+5:30
यंदा सप्टेंबरअखेर झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. शिवाय उसाची लागवडही वाढली आहे. पीक वाढीसाठी यंदा हवामानही अनुकूल ...
यंदा सप्टेंबरअखेर झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. शिवाय उसाची लागवडही वाढली आहे. पीक वाढीसाठी यंदा हवामानही अनुकूल असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी सर्वच पिके जोमात आली आहेत. पोटऱ्यात असलेली ज्वारी निसवून कणसे बाहेर पडू लागल्याने आता ज्वारीचे दाणे खाण्यासाठी बहरलेल्या पिकात पाखरांचा वावर वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र, मजुरीचे दर गगनाला भिडल्यामुळे व कोरोनासारख्या महामारीचा परिणाम शिवाय शेतीमालाला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. नाथसागर धरण भरल्याने डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी येत आहे. त्यामुळे परिसरात पाणी उपलब्ध असल्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा, ऊस ही पिकेदेखील हिरवीगार दिसत आहेत.