सौरकुकरमध्ये होतोय तीस मिनिटांत स्वयंपाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:12 AM2017-12-28T00:12:28+5:302017-12-28T00:12:39+5:30
कुठलेही इंधन न वापरता केवळ सौरऊर्जेचा वापर करून १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांत एका कुटुंबाचा पौष्टिक स्वयंपाक करता येईल. ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना जालन्यातील दोन तरुण अभियंत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. सूर्यप्रकाश नसतानाही रात्रीच्या वेळी अन्न शिजवता येणारे ‘सनविंग्स’ सोलार कुकर त्यांनी तयार केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कुठलेही इंधन न वापरता केवळ सौरऊर्जेचा वापर करून १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांत एका कुटुंबाचा पौष्टिक स्वयंपाक करता येईल. ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना जालन्यातील दोन तरुण अभियंत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. सूर्यप्रकाश नसतानाही रात्रीच्या वेळी अन्न शिजवता येणारे ‘सनविंग्स’ सोलार कुकर त्यांनी तयार केले आहे.
मेकॅनिकल इंजिनिअर व अपारंपरिक उर्जेचा वापर या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विवेक काबरा व प्रॉडक्शन इंजिनिअर असलेले हितेश रायठठ्ठा, अशी या तरुण अभियंत्यांची नावे आहेत. बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘सनविंग्स’ सोलार कुकरबाबत प्रात्याक्षिकासह माहिती देण्यात आली. सौरउर्जेवर वापर करून सौरकुकर तयार करण्यासाठी २००९ मध्ये संशोधनास सुरुवात केली. २०१० मध्ये पहिली सौरचूल तयार केली. २०११ मध्ये सिंम्प्लीफाईड टेक्नॉलाजी फॉर लाईफ या कंपनीच्या माध्यमातून या विषयावर अधिक संशोधनास सुरुवात केली. २०१३ मध्ये जालन्यात जेईएस महाविद्यालयात सौरचुलीच्या वापराबाबत कार्यशाळा घेतली. यात हजारो मुलांनी सहभाग घेत सौरचुलीवर एकाच वेळी केलेल्या विक्रमाची लिम्का बूकमध्ये नोंद झाली. परदेशातही कार्यशाळा घेतल्या. त्यामुळे सौरचुलीचा वापर वाढला. मात्र, ढगाळ वातावरण व रात्रीच्या वेळी सौरचुलीवर स्वयंपाक करण्यास मर्यादा येतात. हे लक्षात आल्यानंतर रात्रीच्या वेळीही किमान सहा जणांच्या कुटुंबाला लागेल एवढे अन्न शिजवता येईल, असे कुकर तयार करण्यावर संशोधन सुरू केले. पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर यश मिळाले. दिवसा मिळणाºया सूर्यप्रकाशाची उर्जा साठवून ठेवत थर्मल बॅटरीच्या मदतीने रात्रीही स्वयंपाक करता येईल, असे सनविंग्स हे सोलारकुकर तयार केले. पूर्णपणे जालन्यात तयार झालेल्या या सोलार कुकरच्या पेटंटसाठी नोंदणी केल्याची माहिती काबरा व रायठठ्ठा यांनी दिली. उद्योजक सुनील रायठठ्ठा यांची या वेळी उपस्थिती होती.
सौलार कुकरच का ?
विवेक काबरा यांनी वॅर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेनशच्या (डब्ल्यूटीओ) एका संशोधनाचा आधारे सांगितले, की भारतासह बहुतांश देशात ७० टक्के नागरिक लाकूड, शेणाच्या गौºयांचा वापर करून चुलीवर, तसेच शहरी भागात रॉकेल, गॅस व विद्युत उपकारणांवर स्वयंपाक करतात. यामुळे पारंपरिक (पान २ वर)