रबीचे पेरणी क्षेत्र दुपटीने वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 12:50 AM2019-11-07T00:50:14+5:302019-11-07T00:50:36+5:30

यंदा रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार असून, सरासरी ५० हजार हेक्टरवर रबी पिकांचा पेरा होण्याची शक्यता आहे.

The sowing area will be doubled | रबीचे पेरणी क्षेत्र दुपटीने वाढणार

रबीचे पेरणी क्षेत्र दुपटीने वाढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी रबीची पेरणी एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र, यंदा रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार असून, सरासरी ५० हजार हेक्टरवर रबी पिकांचा पेरा होण्याची शक्यता आहे.
भोकरदन तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाची बहरून आलेली पीके वाया गेली. याचा परिणाम दिवाळीच्या सणावर झाला. आजही बहुतांश शेतातून पाणी वाहत आहे. त्यामुळे शेतातील मका, सोयाबीन सह काही प्रमाणात शिल्लक राहिलेली इतर पिके हाती लागतात काय ? याचा शोध शेतकरी घेत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पथकातील कर्मचारी शेतात येणार असल्यामुळे शेतकरी दिवसभर शेतामध्ये पथकाची वाट पाहत बसत आहे. रबीच्या गहू, मका, हरबरा, शाळू ज्वारी लागवडीसाठी शेत तयार करण्याची घाई झाली आहे. मात्र; शेतात पाणीच असल्यामुळे आणखी पंधरा दिवस तरी शेतात वापसा होणार नाही, अशी परिस्थिती आहे. रबीच्या गहू, हरबरा या पिकाची लागवड ही १५ आॅक्टोबर ते १५ नोव्हेबरच्या आत होणे आवश्यक आहे.
मात्र तालुक्यातील सर्व शेतात आद्याप खरिपाचे मका, सोयाबीन, बाजरी ही पीके पडून आहेत. या पिकांना अंकुर फुटले आहेत. जनावराचा चारा सडला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मात्र आपल्या हातात काही लागते काय ? याचा शेतात शोध घेत आहे. शिवाय रबीच्या पिकासाठी पाणीसाठा मुबलक झाला असला तरी रबी हंगामामध्ये लागवड करण्यासाठी बियाणे, खते कोठून आणावे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला असून, बियाणे, खते पुरवावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: The sowing area will be doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.