जालना जिल्ह्यात रबीची केवळ १४ टक्केच पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:20 AM2018-11-14T00:20:07+5:302018-11-14T00:20:25+5:30

जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १४ टक्केच रबीची पेरणी झाली आहे.

Sowing of only 14% of Rabi in Jalna district | जालना जिल्ह्यात रबीची केवळ १४ टक्केच पेरणी

जालना जिल्ह्यात रबीची केवळ १४ टक्केच पेरणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम पूर्णत वाया गेला आहे. दुसरीकडे रबी हंगामासाठी जमिनीत ओल नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबविली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १४ टक्केच रबीची पेरणी झाली आहे.
दुष्काळ जणू जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता पूर्वीची तीन वर्षे भीषण दुष्काळी स्थितीत गेली. यंदाही परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तितकीच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात रबीचे १ लाख ५२ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. पंैकी आजवर केवळ १४ टक्केच पेरणी झाली आहे. जालना तालुक्यात २१ हजार ४५५ हेक्टर रबीचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४३ टक्के पेरा झाला आहे. तर बदनापूर तालुक्यात ६ टक्केच पेरणी झाली आहे. जाफराबाद तालुक्यात २७ टक्के पेरणी झाली आहे. तर भोकरदनमध्ये ६ टक्के पेरणी झाली आहे. अंबडमध्ये ० टक्के पेरणी झाली आहे. परतूरमध्ये २ टक्के, घनसावंगीमध्ये १३ आणि मंठा तालुक्यात २३ टक्के पेरणी झाली आहे.
पीक निहाय पेरा पाहता आजवर सवार्धिक ज्वारीची १० हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली. मका २९९ हेक्टरवर, गहू ३ हजार १०० हेक्टरवर, तर हरभºयांचा ६ हजार ९६४ हेक्टरवर पेरा झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहेत.
व्यापारी हैराण
पावसाअभावी खरिपातील पिके हातची गेली आहेत. अपुºया ओलीमुळे रबीची पेरणी रखडली आहे. त्यामुळे बाजारपेठेत खते, बी-बियाणे खरेदीसाठी असणारी शेतक-यांची लगबग यंदा दिसून येत नाही. अनेक व्यापाºयांनी खते बियाणे विक्रीसाठी ठेवली; परंतु शेतकरीच खरेदी करण्यासाठी येत नसल्याने व्यापारी हैराण झाले आहेत.
चाराटंचाई भासणार ?
पाऊस नसल्यामुळे ज्वारी, मका या पिकांची पेरणी कमी झाल्यामुळे येणाºया काळात तीव्र चारा टंचाई भासणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.

Web Title: Sowing of only 14% of Rabi in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.