२३ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:29+5:302021-09-27T04:32:29+5:30
सोयाबीनला विक्रमी भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका, कापसाचे क्षेत्र कमी करून सोयाबीनची लागवड केली. या वर्षी सोयाबीन हे ...
सोयाबीनला विक्रमी भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका, कापसाचे क्षेत्र कमी करून सोयाबीनची लागवड केली. या वर्षी सोयाबीन हे पीक चांगले बहरून आले आहे. हे पीक शेतातून काढणीसाठी आले आहे. मात्र याच वेळी पाऊस सुरू झाला असून, शेतातच सोयाबीनला अंकुर फुटत आहेत. त्यामुळे जर आणखी चार-पाच दिवस पाऊस सुरूच राहिला तर सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या शेंगा वाळल्या आहेत. मात्र या पावसामुळे सोयाबीनचे दाणे झाडावरच फुगत असून, त्यांना अंकुर फुटत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्यातच उभा आहे. त्यामुळे ते पूर्णत: वाया गेले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.