विविध शाळांचे नेत्रदीपक यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:19 AM2019-06-09T00:19:12+5:302019-06-09T00:19:27+5:30
दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात जिल्ह्यातील अनेक शाळांनी उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम राखली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात जिल्ह्यातील अनेक शाळांनी उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम राखली.
सीटीएमके शाळेचे यश
जालना : सीटीएमके गुजराती विद्यालयाचा दहावीचा निकाल ८५ टक्के लागला आहे. यात मयुरी डाके ९७ टक्के, कुनिका शाह ९५.८० टक्के, भाग्यश्री बनछोड ९४.८० टक्के, प्रतीक्षा गंगने ९४.२० टक्के, मानसी देवकर ९३.४०, प्रदीप यादव ९२.४० टक्के, अदनाक माधव प्रशांत ९२.८० टक्के, साक्षी पोलास ९१.७० टक्के, श्वेता औटी ९०.४० टक्के, ऋतुजा पिसे ९१ टक्के, तुषार पाऊलबुद्धे ९१.४० टक्के, स्नेहा भालेराव ९०.२० टक्के यांनी गुण मिळविले तर विशेष प्राविण्यात ८८, प्रथम श्रेणीत १०९, द्वितीय श्रेणीत ८७ व २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेशभाई पटेल, उपाध्यक्ष प्रवीण भानुशाली, मुख्याध्यापक सतीश देशमुख, उपमुख्याध्यापक नामदेव सावंत, जयेश बाविसी, प्रकाश देशमुख, राहुल मसलकर आदींनी कौतुक केले आहे.
नेत्रदीप विद्यालय
जालना : तालुक्यातील मोतीगव्हाण येथील नेत्रदीप विद्यालयाचा दहावीचा निकाल ८७.६१ टक्के लागला आहे. ११३ विद्यार्थ्यांपैकी ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सिंहगड इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल
जालना : औरंगाबाद रस्त्यावरील सिंहगड इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. ऋषिकेश कोटमवार याने ९० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल संस्थाचालक परशुमराम यादव, मुख्याध्यापक विश्वजित वाटोडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
जिजाऊ हायस्कूल, शेलगाव
जालना : जिजाऊ इंग्लिश हायस्कूलचा दहावीचा निकाल ९० टक्के लागला आहे. शाळेतून हरमनप्रीत कौर ७०. ८० टक्के (प्रथम), ऋतुजा कसवे ६९.४० टक्के (द्व्तिीय), संकेत राऊत ६६.४० टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे.