महामार्गावर वाहतूक पोलिसांकडून वेगावर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:16 AM2020-02-27T00:16:01+5:302020-02-27T00:16:36+5:30
जालना-औरंगाबाद महामार्गावर बदनापूर परिसरात जालना पोलीस वाहतूक शाखेकडून वाहनांचा वेग स्पीडगनच्या साह्याने मोजला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलगाव : जालना-औरंगाबाद महामार्गावर बदनापूर परिसरात जालना पोलीस वाहतूक शाखेकडून वाहनांचा वेग स्पीडगनच्या साह्याने मोजला जात आहे. राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याला दोन ते तीन स्पीडगन असलेले स्पेशल वाहने देण्यात आलेली आहेत.
या वाहनांमध्ये स्पीडगन बसविण्यात आलेली असून समोरून येणाऱ्या वाहनाचा १०० ते १२० मीटर अंतरावरून वेग यामध्ये मोजला जातो. जर धावणाºया वाहनाचा वेग जास्त असेल तर ते वाहन ट्रॅक होऊन त्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून संबंधित वाहन मालकावर आॅनलाइन गुन्हा दाखल होतो. याचबरोबर त्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो. महामार्गावर कारसाठी ९०, ट्रकसाठी ८०, दुचाकीसाठी ७०, अशी वेगमर्यादा आहे. सोबतच या गाडीमध्ये ब्रेथनालायझर मशीन असते. त्याच्या साह्याने चालकांची मद्यपान चाचणी करण्यात येते. सोबतच या गाडीमध्ये उपलब्ध असलेल्या टिंटमीटरच्या साह्याने गाडीला असलेली निर्बंधित फिल्म ही ओळखू येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे आर. व्ही. राऊत, आर. एस. गुसिंगे, जी. आर. नागलोत यांनी दिली. यामुळे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्याचेही पुढे आले आहे.