शिबिरात सर्वधर्मियांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:15+5:302021-07-19T04:20:15+5:30

जालना : ‘लोकमत - रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत रविवारी जालना शहरात आयोजित रक्तदान शिबिरात सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लसीकरण केले. कोरोनाच्या ...

Spontaneous blood donation of all religions in the camp | शिबिरात सर्वधर्मियांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

शिबिरात सर्वधर्मियांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

Next

जालना : ‘लोकमत - रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत रविवारी जालना शहरात आयोजित रक्तदान शिबिरात सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लसीकरण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत, जमाते इस्लामी हिंद, रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनच्या वतीने रविवारी दुखीनगर भागातील जमात ए इस्लामी हिंदच्या कार्यालयात हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात अब्दुल जावेद अब्दुल रहमान यांनी स्वत:चे ६१वे रक्तदान केले. तसेच अझहर शहा मजहरुद्दीन यांनी ३६वे, शेख असद शेख वाहेद यांनी ३२वे, सलीम खान फौजी यांनी स्वत:चे ३१वे, तर अमजद शेख मंजूर यांनी स्वत:चे १० व्या वेळचे रक्तदान केले. तसेच इतर सर्वधर्मीय मान्यवरांनी या शिबिरात रक्तदान केले.

कार्यक्रमास ‘लोकमत’ समाचारचे संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, रोटरी क्लब जालना मिडटाउनचे अध्यक्ष ॲड. महेश धन्नावत, सचिव प्रशांत बागडी, डॉ. प्रतीक लाहोटी, वीरेश बगड़िया, गौरव मोदी, प्रतीक नानावटी, सूरज गेही, अनुज बगडिया, फेरोज अली, तय्यब देशमुख, आदींची उपस्थिती होती. नूर हॉस्पिटलचे डॉ. डी. एम. भद्रे, डॉ. जुनेद सैय्यद, विवेक मोरे, खान करामत, शेख मौला व इतरांनी रक्तसंकलनाचे काम पाहिले.

यांनी घेेतले परिश्रम

शिबिरासाठी जमाते इस्लामी हिंदचे राज्य सचिव शेख मुजीब, शहराध्यक्ष शेख इस्माईल, खिदमते खलक, विभाग सचिव सैय्यद शाकेर, जावेद अहमद, एमपीजे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम, लतिफोद्दीन सिद्दीकी, गुफरान खान, अकबर असद, मो. इलियास पठाण व इतरांनी परिश्रम घेतले.

Web Title: Spontaneous blood donation of all religions in the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.