जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘आॅन दी स्पॉट’ पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:05 AM2019-01-09T00:05:03+5:302019-01-09T00:05:42+5:30
मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील टंचाई आढावा बैठक घेऊन अधिकारी, कर्मचा-यांची चांगलीच कानउघडणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने बळीराजा हैराण आहे. शेतमजूरांच्या हाताला कामे नाहीत, त्यातच पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. असे असतानाही गाव पातळीवरील अधिकारी, कर्मचारी हे चलता है धोरण स्वीकारत असल्याने याची दखल घेत मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील टंचाई आढावा बैठक घेऊन अधिकारी, कर्मचा-यांची चांगलीच कानउघडणी केली.
जालना जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ६१ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपासह रबी हंगामही शेतक-यांच्या हातातून गेल्याने यंदा पाणीटंचाईसह अन्नधान्याची टंचाईही जाणवणार आहे. त्यातच आता साधारणपणे जूनपर्यंत शेतीत कुठलेच काम नसल्याने मजुरांवर स्थलांतराची वेळ येत आहे. त्यामुळे मजुरांना त्यांच्या गावातच हाताला कामे उपलब्ध व्हावीत या हेतूने
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त कामे हाती घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात गोदावरी नदीचा किनारा सोडल्यास अन्य तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. भोकरदन, जाफराबाद, जालना, बदनापूर आणि मंठा तालुक्यांचा यात विशेष करून समावेश होतो.
त्यामुळे या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी, शेतमजूर
तसेच लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच झालेल्या आढावा बैठकांमधून केली आहे.
एक तलाठी निलंबित
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बिनवडे यांनी अंबड येथे अंबड आणि घनसावंगी तालुक्याची बैठक घेतली. यावेळी त्यांनी टंचाईचा आढावा घेतला. याच बैठकीत रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. त्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरू नाही अशा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांना दिले. तसेच चाराटंचाई, पाणंद रस्ते, स्वच्छता अभियान आणि अन्य महत्वाच्या मुद्यावर जिल्हाधिका-यांनी माहिती जाणून घेतली. सजावर न राहणाºया तलाठ्यांच्या वारंवार येणा-या तक्रारीवरून एका तलाठ्यास निलंबित करण्याचा निर्णय बैठकीतच घेण्यात आला.
तालुकानिहाय टंचाई बैठका
दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्हाधिकारी बिनवडे यांनी जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या संयुक्त बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी अंबड आणि घनसावंगी तालुक्याची बैठक पार पडली. बुधवारी परतूर आणि मंठा तर गुरूवारी जालना आणि बदनापूर तालुक्यांच्या बैठका होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात देखील आढावा बैठक घेणार आहेत.
मठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील आलमगाव येथे जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ अंतर्गत झालेल्या कंम्पार्टमेंन्ट बंडींग (जमिनीवर बांध टाकणे) कामाची पाहणी मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केली.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महेंकर, अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार किशोर देशमुख, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळ अधिकारी गाडेकर, कृषी सहायक कीर्तीकर, सरपंच अशोक भिसे, ग्रामसेवक एन.डी.खरात, तलाठी खेडेकर, देविदास शेळके, कौतुक पवार, रामेश्वर गोंटे, गोकुळ खरात, सुभाष शेळके, शिवाजी शेळके, रोजगार सेवक हनुमान भारती, कुंभारी उगले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.