पीकस्पर्धेत श्रीकांत आखाडे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:45+5:302021-06-30T04:19:45+5:30
जयंतीनिमित्त अभिवादन जालना : येथील राष्ट्रीय एकात्मता सामाजिक मंचाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधीचमन येथे ...
जयंतीनिमित्त अभिवादन
जालना : येथील राष्ट्रीय एकात्मता सामाजिक मंचाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधीचमन येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, किशोर जिगे, विजय बनकर, गोपी नाटेकर, विष्णू पाचफुले आदी उपस्थित होते.
सचिवपदी मोहन बाण यांची निवड
आष्टी : परतूर येथे शनिवारी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परतूर तालुक्यातील बाणाचीवाडी येथील मोहन बाण यांची राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डाॅ. निसार देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती देऊन सत्कार करण्यात आला.
खालापुरे यांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार
परतूर : येथील जिल्हा परिषद प्रशालेजवळील रहिवासी डिगांबर गणेश खालापुरे यांना आदिवासी विकास विभागात माध्यमिक शिक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. शासकीय आश्रमशाळा, तीसगाव (ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) या ठिकाणी त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. खालापुरे यांचा कपिल आकात, बाबासाहेब तेलगड, संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण आदींनी सत्कार केला.
रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी
भोकरदन : जुने भोकरदन ते रामपूरपर्यंतचा शिव रस्ता मोकळा करून देण्यासाठी गणेश तळेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात भोकरदन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. शिव रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी शेतीशाळेचे आयोजन
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील रवाना येथे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी, पोकरा प्रकल्पाअंतर्गत हवामान आधारित तंत्रज्ञान शेती शाळा घेण्यात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बीएफ अर्थात रुंद सरी वरंबा पद्धतीने करावे, असे आवाहन शेतीशाळा प्रशिक्षक हनुमान लोंढे यांनी केले.
नागरिकांची गैरसोय
परतूर : शहरांतर्गत विविध भागातील नाल्या तुंबल्या आहेत. थोडाही पाऊस झाला की, या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
शिक्षक समितीचे निवेदन
जालना : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षक संघर्ष संघटना व कृती समितीच्या वतीने पालकमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष सचिन देशमुख, नंदकिशोर लेखणार, मोहन नेहरे, भारत सोनवणे, दीपक सुसर, प्रा. वासरे, कळंबे, नवले, काकडे, कैलास जाधव आदींची उपस्थिती होती.