धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:07 AM2019-04-08T00:07:37+5:302019-04-08T00:07:57+5:30
अंबड तालुक्यातील नांदी येथे सोरट अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकांवर तीस ते चाळीस जणांनी दगडफेक केल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड : अंबड तालुक्यातील नांदी येथे सोरट अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकांवर तीस ते चाळीस जणांनी दगडफेक केल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ३० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सय्यद सत्तार सय्यद कटू, अयुब सत्तार सय्यद, इस्माईल अमाम सय्यद, कय्युम सत्तार सय्यद, तय्यब निसार सय्यद, कलीम इसाक सय्यद, सिराज निजाम सय्यद, अझहर मन्सूर सय्यद, सय्यद फकीर सय्यद मिजाम, सय्यद अमद सय्यद फिकर महम्मद, इस्ताफ, उस्मान, नूर, तस्लीम सय्यद, अलताब सय्यद, सय्यद बाबूलाल सय्यद उस्मान, सय्यद हुजूर सय्यद मकबूल, सय्यद जावेद सय्यद मंजीत, सय्यद नय्युम सय्यद अय्युब, शबाना सय्यद कय्यूम, (रा. नांदी, ता. अंबड) व इतर अनोळखी
१० ते १२ तसेच तीन महिलांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदी येथील वडाच्या झाडाखाली काही सोरट जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी छापा मारुन जुगाराच्या साहित्यासह ५ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याचवेळी तीन ते चार महिलांनी पोलिसांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.
पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोलीस उपनिरीक्षक शेजूळ व कर्मचाऱ्यांनी या महिलांना पळवून लावले.
परंतु, येथील तीस ते चाळीस जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात एक पोलीस मित्र व पोलीस उपनिरीक्षक चाटे जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सात जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.