धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:49 AM2017-11-28T00:49:53+5:302017-11-28T00:50:02+5:30

शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला सोमवारी सकाळी सुरुवात झाली

Start of deletion of encroachment of religious places | धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

googlenewsNext

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. नगरपालिका व पोलीस प्र्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत शहरातील विविध भागांतील १०९ ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक जागांवरील धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढून टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. समितीला सर्वेक्षणात नवीन जालना व जुन्या जालन्यात एकूण सुमारे ४५० ठिकाणी धार्मिक स्थळांची अतिक्रमणे आढळून आली. पैकी १७ ठिकाणची अतिक्रमणे पालिकेने या पूर्वी मोहीम राबवून काढून टाकली. तर रहदारीस अडथळा न ठरणारी बहुतांश अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रिया राबवून नियमित केली आहेत. उर्वरित १०९ ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेला सकाळी कडबीमंडी परिसरात मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांच्या उपस्थितीत मोठ्या फौजफाट्यात सुरुवात झाली. सदर बाजार झोन एक, झोन दोनमधील अतिक्रमणे सुरुवातीला हटविण्यात आली. त्यानंतर मुर्गीतलाव परिसरातील अतिक्रमणे पाडण्यात आली. शहरातील मोदीखान्यातील तीन, कन्हैयानगर भागातील सहा, छायीपुरा, चरवाईपुरा, मोदीखाना, कडबीमंडी, टाँगा स्टँण्ड, बन्सीपुरा, छप्परबन मोहल्ला, जवाहरबाग, काजीपुरा या भागात मुख्य रस्त्यालगत, अंतर्गत रस्त्यावरील एकूण १९ अतिक्रमणे पालिकेच्या कर्मचाºयांनी दोन जेसीबी, १२ टॅक्टरच्या मदतीने सायंकाळपर्यंत हटविल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिक्रमण हटविताना धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची प्रशासनाकडून पूर्णपणे काळजी घेण्यात आली. नगरपालिकेचे शहर अभियंता रत्नाकर अडसिरे, माधव जामदडे, स्वच्छता निरीक्षक पंडित पवार, संजय खर्डेकर, सॅमसंग कसबे, अशोक लोंढे, विलास गावंडे, संतोष शिरगुळे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, महादेव राऊत, बाळासाहेब पवार, योगेश गावंडे, नगर पालिकेचे सर्व सफाई कामगार, चारही पोलीस ठाण्यांतील कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. ही अतिक्रमण हटाव मोहीम आणखी तीन दिवस सुरू राहणार आहे.

Web Title: Start of deletion of encroachment of religious places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.