जाफराबादेत अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:35 AM2017-12-16T00:35:09+5:302017-12-16T00:35:38+5:30

जाफराबाद शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीत थाटण्यात आलेली अवैध दुकाने हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली.

Start of demolishing of encroachments in Jafarabad | जाफराबादेत अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

जाफराबादेत अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

googlenewsNext

जाफराबाद : जाफराबाद शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीत थाटण्यात आलेली अवैध दुकाने हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. नियमबाह्य दुकाने थाटून व्यवसाय करणाºया अतिक्रमण धारकांवर प्रथमच अशी कारवाई होत असल्याने अनेकांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली.
सकाळीच महसूल विभागाच्या वतीने विभागीय अधिकारी हरिचंद्र गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, तहसीलदार जे. डी. वळवी, पोलीस निरीक्षक पाटील, नायब तहसीलदार बी. के. चंडोळ, खैरनार यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. शहरात प्रथमच अशा प्रकारची कारवाई होत असल्यामुळे रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. सुरुवातीलाच तहसील कार्यालयासमोर बांधण्यात आलेले नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष दीपक पाटील यांची दुकाने हटविण्यात आली. त्याला लागून असलेली इतर दुकानेही पाडण्यात आली. जेसीबी मशीनच्या साहाय्याने रस्त्यावर आलेले शेड, टप-या, दुकाने, पक्के बांधकाम कारवाई तोडण्यात आले. प्रशासनाने सूचना देऊनही अतिक्रमण काढून न घेणा-यांची ऐन वेळी मात्र चांगलीच धावपळ झाली. त्यामुळे दुकानांमधील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काहींनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेतली. अतिक्रमण काढताना बांधकाम विभागाच्या हद्दीचा वाद स्पष्ट नसल्याने तर काही न्यायालयीन आदेशाने बांधकाम करून देखील पाडण्यात आले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
............
कारवाईबाबत अधिका-यांमध्ये अस्पष्टता
शहरात शंभर फूट म्हणजेच तीस मीटरचा रस्ता बांधकाम विभागाचा आहे. डांबरीकरण रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्ही बाजूने पंधरा मीटर असलेला रस्ता मोकळा करण्यात येत आहे. मात्र, अतिक्रमण काढताना काळजी न घेता नियमबाह्य कारवाई करण्यात आल्याचे नागरिक सांगत आहेत. बांधकाम विभाचा रस्ता डांबरीकरण रस्त्याच्या मध्य भागातून पन्नास फूट की पंचावन्न फूट रुंद हे बांधकाम विभागांच्या अधिका-यांनी स्पष्ट केले नाही.
---------------
कारवाई राजकीय द्वेषातून
तहसील परिसरातील माझ्या मालकीच्या दुकानावर करण्यात आलेली कारवाई खासदार, आमदार यांच्या दबावातून केली आहे. तहसील आणि बांधकाम विभागाच्या जागेत कुठेही बांधकाम नसताना, तसेच न्यायालयाचा मनाई हुकूम असताना, सूडबुद्धीने अतिक्रमण हटाव कारवाई झाल्याचे दीपक वाकडे यांनी सांगितले.

Web Title: Start of demolishing of encroachments in Jafarabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.