दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी कामे सुरु करा -जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:44 AM2018-10-23T00:44:50+5:302018-10-23T00:46:11+5:30
जालना जिल्ह्यात दुष्काळाने तीव्र स्वरुप धारण केले असून शेतकरी, व सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. असे असताना अद्याप जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून कोणतीही दुष्काळी कामे सुरु झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात दुष्काळाने तीव्र स्वरुप धारण केले असून शेतकरी, व सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. असे असताना अद्याप जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून कोणतीही दुष्काळी कामे सुरु झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोामवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळात किसान सेनेचे भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख पंंडित भुतेकर, भगवान कदम, माधवराव कदम, सभापती पांडूरंग डोगरे, भरत मदन, हनुमान धांडे, रमेश गव्हाड, मनिष श्रीवास्तव, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, दलित आघाडीचे अॅड. भास्कर मगरे, महिला आघाडीच्या सविता किवंडे, युवा सेनेचे भाऊसाहेब घुगे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, बदनापुरचे तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी , दिपक रणनवरे, संदीप झारखंडे, आदींची उपस्थिती होती.
शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईग्रस्त भागामध्ये तात्काळ टँकर सुरु करण्यात यावे, जेणेकरुन हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनता कोसोदुर त्यांची भटवंष्ठती होणार नाही. तसेच तात्काळ दुष्काळ जाहीर झाल्यास रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अतिशय हतांश झालेल्या शेतकठयांना व मजुरांना या मुळे काम मिळण्यास मदत होईल. तसेच मागील व चालु वषीर्चे बोंडअळीचे अनुदान अनेक शेतकठयांना मिळालेले नाही. तरीही उर्वरित अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी हरीहर शिंदे, जि.प. सदस्य उत्तमराव वानखेडे, मुरली बाबा थेटे, अप्पासाहेब घोडगे, सखाराम गिराम, यादवराव राऊत, कुरेशी, बबनराव खरात, वैष्ठलास चव्हाण, महेश पुरोहिते, गणेश डोळस, पंचायत समितीचे सदस्य राम काळे, अरुण डोळसे, भगवान शिंदे, श्रीराम कान्हीरे, किसान खांडेकर, रवि बोचरे, सुनिल कांबळे, जर्नाधन चौधरी, सुधीर पाखरे, राधाबाई वाढेकर, दुर्गा देशमुख, मंजुषा घायाळ, संगिता नागरगोजे, अप्पासाहेब उगले आदीसंह शेकडो शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.