निधी संकलनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:27 AM2021-01-22T04:27:56+5:302021-01-22T04:27:56+5:30
स्टीलचे दर वाढले जालना : जिल्ह्यात अद्यापही वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे चढ्या दराने वाळूची विक्री होत आहे. ...
स्टीलचे दर वाढले
जालना : जिल्ह्यात अद्यापही वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे चढ्या दराने वाळूची विक्री होत आहे. असे असतानाच आता स्टीलच्याही दरात वाढ झाली आहे. याचा फटका बांधकाम क्षेत्राला बसत आहे. सध्या वाळूच्या ३ ब्रासच्या टिपसाठी ३० ते ३५ हजार रुपये लागत असल्याचे माहिती देण्यात आली. यातच आता स्टीलचेही दर चढले आहेत.
प्रवाशांकडून बसला चांगला प्रतिसाद
जालना : कोरोनामुळे विस्कळीत झालेली जिल्ह्यातील बससेवा ग्रामीण भाग वगळता पूर्वपदावर आली आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई यांसह दूरच्या मार्गावर असलेल्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनेही अधिकच्या बसेस सोडण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अध्यक्षपदी सोपान सपकाळ यांची नियुक्ती
भोकरदन : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया भोकरदन - जाफराबाद विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी सोपान सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष अभिजीत सपकाळ, विजय खामकर, चैतन्य पुरंदरे, राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल आदींनी सपकाळ यांचे स्वागत केले.