संस्काराचे मोती उपक्रमाचा जालन्यात जल्लोषात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:12 AM2018-07-28T01:12:54+5:302018-07-28T01:13:22+5:30

लोकमतच्या संस्काराचे मोती या उपक्रमाचे शुक्रवारी गुरूपोर्णिमेचे औचित्य साधून येथील जैन इंग्रजी शाळेत थाटात आणि विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषाता प्रारंभ करण्यात आला. प्रारंंभी ऋषी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Start of Sanskarache Moti event in Jalna | संस्काराचे मोती उपक्रमाचा जालन्यात जल्लोषात प्रारंभ

संस्काराचे मोती उपक्रमाचा जालन्यात जल्लोषात प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकमतच्या संस्काराचे मोती या उपक्रमाचे शुक्रवारी गुरूपोर्णिमेचे औचित्य साधून येथील जैन इंग्रजी शाळेत थाटात आणि विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषाता प्रारंभ करण्यात आला. प्रारंंभी ऋषी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी गुरूपौर्णिमेचे महत्व विषद करणारी भाषणे करून गुरूचे जीवनातील महत्त्व विषद केले.
सकाळी आठ वाजता सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानावर त्यांच्या शाळेच्या गणवेशात शिस्तबध्द पध्दतीने उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापिका बी.आर. सारडा, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शोभना गोयल, पर्यवेक्षिका एलिना निर्मल यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी सारडा यांनी संस्काराचे मोती उपक्रमात आमच्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षीच हिरीरीने सहभाग घेत असल्याचे सांगून याही वर्षी असाच भरघोस सहभाग राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी शाखाधिकारी मकररंद शहापूरकर यांनी संस्काराच्या मोती उपक्रमा विषयी तसेच त्यातील विद्यार्थ्यांसाठीच्या असलेल्या भरघोस बक्षीसांविषयी सविस्तर मािहती दिली. यावेळी एक आॅगस्ट ते १३ नोव्हेंबर असा हा उपक्रम शंभर चालणार असून, संस्काराचे मोती या स्वतंत्र पानावर बोधकथा, सुविचार, परिपाठ तसेच वन्यजीव प्राणी संरक्षण आणि पर्यावरण रक्षण यावर माहितीपर विशेष सदर चालविले जात आहे. जे की विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे शहापूरकर यांनी सांगितले.
दरम्यान या काळात या पानावर शंभर कूपन प्रसिध्द करण्यात येणार असून, त्यातील ८५ कूपन प्रवेशिकेवर चिकटवणे बंधनकारक राहणार आहे. यावेळी जिल्हा प्रतिनिधी संजय देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास अभिषेक कुंटे, गुलाब साळुंके, बाळासाहेब सुतार, कासेब शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी गुरूपौर्णिमे निमित्त गुरूवंदना करण्यात आली. सूत्रसंचालन तारा शर्मा यांनी केले.

Web Title: Start of Sanskarache Moti event in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.