जालन्यात रविवारी रंगणार राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:03 AM2018-03-30T01:03:07+5:302018-03-30T01:03:07+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.
कवी संमेलनाच्या आयोजनाबाबत अॅड. कैलास रत्नपारखे यांनी सांगितले, की सात वर्षांपूर्वी ‘साहेब बना’ त्या अंतर्गत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून जयभीम कविसंमेलन घेतले जाते. कवी संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त जगदीश बुक्तारे हे राहतील. संमेलनात डॉ. कैलास दौंड (अहमदनगर) मोहन सिरसाट (वाशिम), संदीप काळे (पाडळी) रेणुकादास नर्सीकर (परभणी) पांडुरंग सरोदे (मुंबई) डॉ. बी.जी. श्रीरामे, नजीम खान, रेखा गतखणे, अॅड. अर्शद बागवान, उषा बोर्डे, रितू लांडगे यांचा सहभाग राहणार आहे. पत्रकार परिषदेस डॉ. प्रभाकर शेळके, संजय हेरकर, सुभाष बोर्डे, प्रा. शिवाजी लहाने, बाळासाहेब रत्नपारखे, राहुल भालेराव, विलास रत्नपारखे, अनिल रत्नपारखे, शालूमन आठवले यांची उपस्थिती होती.