नवनिर्माण सेनेचे अधीक्षकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:14+5:302021-06-04T04:23:14+5:30
याचवेळी जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील रामेश्वर प्रभाकर शेळके यांचा ट्रॅक्टर परस्पर लांबविल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी ...
याचवेळी जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील रामेश्वर प्रभाकर शेळके यांचा ट्रॅक्टर परस्पर लांबविल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक देशमुख यांनी चौकशीचे आश्वासन दिले.
०००००००००००००००
भाजप ओबीसी मोर्चाची तीव्र निदर्शने
पुनर्विचार याचिका दाखल करावी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. ही बाब समाजासाठी दुर्दैवी आहे. यासाठी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
गुरुवारी भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणासाठी कुठलीच हालचाल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकूणच याबद्दल संपूर्ण राज्यभर राज्य सरकारच्या विराेधात रोष व्यक्त केला जात आहे. याची दखल सरकारने घ्यावी यासाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, रामेश्वर भांदरगे, बद्रिनाथ पठाडे, अतीक खान, सिध्दिविनायक मुळे, धनराज काबलीये, सुहास मुंडे, सिध्देश्वर हसबे, सतीश केरकर, संतोष पवार, बद्रिनाथ वाघ, पवन झुंगे, विजय मतकर, शंकर लहामगे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी निर्दशने करून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
०००००००००००००
जिल्हाधिकाऱ्यांकडून हडप येथे पाहणी
जालना : कृषी विभागाच्यावतीने आत्मा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कंपनीची स्थापना केली आहे. त्यातून ना नफा ना तोटा या तत्त्वावर खाद्यतेलाचा प्रकल्प उभारला आहे. याअंतर्गत विविध ब्रँड त्यांनी विकसित केल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पास गुरुवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक तथा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी, अर्जुन माद्दलवार यांची उपस्थिती होती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत, खाद्यतेलाची मागणी लक्षात घेऊन, ही शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. शेंगदाणा, करडी, मोहरी आदी तेलाची निर्मिती येथे केली जाणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देताना सांगितले.