वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:14 AM2021-01-24T04:14:22+5:302021-01-24T04:14:22+5:30

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील वाढीव वीजबील भरण्यासाठी करण्यात आलेली सक्ती तत्काळ थांबवावी, थकीत वीजबील असलेल्या ...

Statement to the officials of the power distribution company | वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन

Next

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील वाढीव वीजबील भरण्यासाठी करण्यात आलेली सक्ती तत्काळ थांबवावी, थकीत वीजबील असलेल्या नागरिकांचा वीजपुरवठा तोडू नये, यासह विविध मागण्यांचे निवेदन रॉयल ग्रुपच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

कोरोनामुळे मध्यंतरी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हाताला काम राहिले नव्हते. दरम्यान अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. यातून आता ग्रामस्थ सावरत असतानाच महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील थकीत वाढीव वीजबिल भरण्यासाठीची सक्तीची वसुली मोहीम सुरू केली आहे. यात काही ठिकाणी विद्युतपुरवठा खंडितही केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी मुकेश प्रधान, आकाश गाडेकर, प्रदीप गाडेकर, रमेश कासार, विकास साबळे, सोमेश वानखेडे, संजय भालेकर, सरफराज पठाण, अजय शिंदे, ब्रिजेश कासार, गंगासागर साबळे, तेजस गाडेकर, मिलिंद वानखेडे, ऋत्विक गाडेकर, रोहन वानखेडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Statement to the officials of the power distribution company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.